CNG and PNG Rate hike : दिवसागणिक महागाईचा भडका उडताना दिसत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. आधीचं कोरोना (coronavirus) संकटानं हैराण असलेल्या सर्वसामान्य जनतेला महागाईची झळ बसत आहे. त्यातच आता महानगर गॅसनं सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ केली आहे. सहा आठवड्यात तिसऱ्यांदा वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसणार आहे. महानगर गॅसने (Mahanagar gas) मुंबईत सीएनजी प्रतिकिलो 3 रुपये 6 पैशांनी तर पीएनजी 2 रुपये 6 पैशांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून ही दरवाढ लागू होणार आहे. 
(CNG and PNG prices again increased)


नव्या दरानुसार मुंबईत एक किलो सीएनजीसाठी 61 रुपये 50 पैसे तर एक किलो पीएनजीसाठी 36 रुपये 50 पैसे मोजावे लागणार आहेत. गेल्या दोन महिन्यातील सीएनजी आणि पीएनजीमधली ही तिसरी दरवाढ आहे. दररोजच्या भाववाढीमुळे देशातील महागाईचा उच्चांक दिसून येत आहे. सर्वच वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलेंडरही (gas cylinder) 900 रुपयांच्या पुढे गेलाय. तर पेट्रोलनं केव्हाच शंभरी पार केली आहे. (CNG and PNG Rate hike) 



आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नैसर्गिक वायूच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे एमजीएलच्या इनपुट गॅसच्या किमतीतही लक्षणीय वाढ झाली आहे. गॅसच्या इनपुट खर्चातील वाढ अंशतः भरून काढण्यासाठी सीएनजीच्या मूळ किमतीत वाढ केली जात आहे.


सोलापुरात सीएनजीचे काय दर?
राज्यभरात काही ठिकाणी रात्रीपासून सीएनजी आणि पीएनजी या दरामध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. सर्वत्र सीएनजी चे दर वेगवेगळे आहेत. सोलापुरातील सीएनजीचे दर ते 81 रुपयांवर पोहोचले आहेत. सोलापुरात सीएनजी डेपो नाहीये. त्यामुळे पुण्यावरून टॅंकरद्वारे सीएनजीचा पुरवठा केला जातो. वाहतुकीचा अतिरिक्त खर्च असल्याने सीएनजी चे दर जास्त असल्याची माहिती पंप चालकांनी दिली. पेट्रोल आणि डिझेल पेक्षा हे दर कमी असल्याकारणाने सीएनजी परवडते अशी प्रतिक्रिया ग्राहकांनी दिली. घाट सध्या सोलापुरात केवळ दोनच सीएनजी पंप सुरू असल्याने पेट्रोल पंपाच्या बाहेर लांबच लांब रांगा देखील पाहायला मिळत आहे.


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live 



संबधित बातम्या :
Best Mileage CNG Cars : 'या' आहेत जास्त माइलेज देणाऱ्या स्वस्त CNG कार, कमी किंमतीत भन्नाट फिचर्स
रिक्षा भाडेवाढीनंतर पुणेकरांना दुसरा झटका, सीएनजी दरात 1 रुपया 80 पैशांची वाढ
Price Rise : सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका! सर्वसामान्यांच्या खिशाचा भार वाढणार