Best Mileage CNG Cars : 'या' आहेत जास्त माइलेज देणाऱ्या स्वस्त CNG कार, कमी किंमतीत भन्नाट फिचर्स
Best Mileage CNG Cars : जर तुम्ही वाढलेल्या पेट्रोलच्या दरांमुळे त्रस्त असाल आणि सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हांला नक्कीच कार आणि मायलेजबाबत अनेक प्रश्न पडले असतील. कारचं माइलेज चांगलं असेल तर इंधनावर होणारा खर्चही कमी होतो. अशातच जर तुम्हांला कमी किंमतीत जास्त कारबाबत जाणून घ्यायची असेल तर, इथे तुम्हांला ही माहिती मिळेल. आम्ही तुम्हांला जास्त माइलेज तीन स्वस्त कारच माहिती देणार आहोत. या तिन्ही कार सीएनजीवर चालणाऱ्या असून उत्तम मायलेज देतात. यामधील एक कार 30 किलोमीटरचं माइलेज देते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमारुती सुझुकी वैगनआर (Maruti WagonR): भारतात सर्वात जास्त विक्री होणाऱ्या कारमध्ये मारुती सुझुकीची हैचबैक कारही एक उत्तम पर्याय आहे. वैगनआर कारची किंमत 4.93 लाख रुपयांपासून सुरु होते. यामध्ये पेट्रोल आणि सीएनजीचा पर्याय आहे. पेट्रोल कारचं माइलेज 21.79 किमी/लीटर आहे. तर, सीएनजी कारचं माइलेज 32.52 किलोमीटर आहे. यामध्ये 1.0 लीटर आणि 1.20 लीटर इंजनचा पर्याय आहे.
ह्युंदाई सँट्रो (Hyundai Santro): ही एक परवडणारी हैचबैक कार आहे. यामध्ये पेट्रोल इंजिनसह सीएनजी इंजिनचाही पर्याय उपलब्ध आहे. ही कार सीएनजीवर 29 किलोमीटर माइलेज देते. या सीएनजी कारची किंमत 5,99,000 रुपयांपासून ते 6,21,000 रुपयांपर्यंत आहे.
मारुति सुझुकी ऑल्टो (Maruti Suzuki Alto) : माइलेज देणाऱ्या सीएनजी कारमध्ये मारुती सुझुकी ऑल्टोचं नाव आर्वजून घेतलं जातं. या सीएनजी कारमध्ये 31.5 किलोमीटर प्रति किलोग्रॅम माइलेज मिळतं मारुती सुझुकी ऑल्टोमधीये 796सीसी, सिलिंडर F8D इंजिन आहे. या कारची किंमत 4,76,500 रुपयांपासून सुरु होते.