एक्स्प्लोर

मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणी जेल अधीक्षकांसह सहा जणांवर आरोप निश्चित!

जेल अधीक्षक मनीष पोखरकरसह महिला जेल पोलिस बिंदू नाईकवडे, वसिमा शेख, शितल शेगावकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे या सहा जेल पोलिसांनी हेतुपुरस्सर मंजुळाची हत्या केल्याचा आरोप आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे.

मुंबई : मंजुळा शेट्ये प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने जेल अधीक्षक मनिषा पोखरकर यांच्यासह सहा जणांविरोधात आरोप निश्चित केले आहेत. कलम 302 नुसार हत्या करणे, कलम 120 ब नुसार हत्येचा कट रचणे, कलम 201 नुसार पुरावा नाहीसा करणे आणि कलम 501 नुसार मरेपर्यंत मारहाण करणे या कलमांखाली हे आरोप निश्चित करण्यात आले आहेत. जेल अधीक्षक मनीष पोखरकरसह महिला जेल पोलिस बिंदू नाईकवडे, वसिमा शेख, शितल शेगावकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे या सहा जेल पोलिसांनी हेतुपुरस्सर मंजुळाची हत्या केल्याचा आरोप आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे. भायखळा जेलमध्ये महिला कैदी मंजुळा शेट्येचा खूनच झाला होता, असं क्राईम ब्रांचच्या तपासात समोर आलं आहे. साक्षीदार आणि वस्तूजन्य पुराव्यांच्या आधारे स्पष्ट झाल्याचे मुंबई क्राईम ब्रांचने आपल्या आरोपपत्रात नमूद केलं आहे. 23 जूनच्या रात्री मंजुळा शेट्ये या महिला कैदीला अमानुष मारहाण करण्यात आली आणि यातच तिचा मृत्यू झाला. पण मारहाण करणाऱ्या महिला जेल पोलिस अधिकाऱ्यांना पूर्ण कल्पना होती की, आपण जे कृत्य करतोय त्यामुळे एखादी गंभीर घटना घडू शकते, असं असतानाही मंजुळाला मारहाण करण्यात आली, ती तिची हत्या करण्याच्या उद्देशानेच असं आरोपपत्रात नमूद करण्यात आल्याचं क्राईम ब्रांचने म्हटलं आहे. एकूण 990 पानांचे हे आरोपत्र असून यात 182 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले असून यात 97 कैद्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यात शिना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचा जबाब आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आला आहे. तर सीसीटीव्ही फुटेज या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा असल्याचं आरोपपत्रात नमूद करण्यात आला आहे. संबंधित बातम्या मंजुळा शेट्टये हत्या प्रकरण, सहा तुरूंग कर्मचाऱ्यांचं आरोपपत्रात नाव मंजुळा शेट्ये मृत्यूशी आपला काही संबंध नाही, स्वाती साठेंचं कोर्टात स्पष्टीकरण मंजुळा शेट्ये प्रकरणाचा चौकशी अहवाल अंतिम टप्प्यात मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणी हायकोर्टानं सरकारला झापलं मंजुळा कारागृहात चक्कर येऊन कोसळली, पोलिसांचा कोर्टात दावा

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Munde : तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
CSMT : सीएसएमटीहून सुटणाऱ्या प्रत्येक ट्रेनमध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' जयघोष करा; राहुल नार्वेकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
सीएसएमटीहून सुटणाऱ्या प्रत्येक ट्रेनमध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' जयघोष करा; राहुल नार्वेकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
Tardeo Estate Agent Controversy : मटण-मच्छी खात असाल तर मुंबईतील ताडदेवमध्ये घर मिळणार नाही; एजंट भावेश कावरेचा वादग्रस्त व्हिडीओ, सोशल मीडियात संताप
मटण-मच्छी खात असाल तर मुंबईतील ताडदेवमध्ये घर मिळणार नाही; एजंट भावेश कावरेचा वादग्रस्त व्हिडीओ, सोशल मीडियात संताप

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget