एक्स्प्लोर

मुंबईतील भेंडीबाजारमध्ये इमारत कोसळली

मुंबईतील भेंडीबाजार भागात पाकमोडिया स्ट्रीटवर हुसैनीवाला ही सुमारे सव्वाशे वर्ष जुनी इमारत होती.

मुंबई : मुंबईतील भेंडीबाजार भागात पाकमोडिया स्ट्रीटवर असलेली हुसैनीवाला बिल्डिंग ही सहामजली इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी आहेत. 21 जणांना इमारतीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं असून 60 ते 65 रहिवासी अडकल्याची भीती आहे. मुंबईतील भेंडीबाजार भागात पाकमोडिया स्ट्रीटवर हुसैनीवाला ही सुमारे सव्वाशे वर्ष जुनी इमारत होती. मूळ तीनमजली असलेल्या इमारतीवर तीन मजले नंतर बांधण्यात आले होते. गुरुवारी सकाळी आठ-साडेआठच्या दरम्यान ही इमारत कोसळल्याची माहिती आहे. इमारतीत 12 खोल्या आणि सहा गोदामं असल्याचं भाजपचे स्थानिक नगरसेवक अतुल शाह यांनी सांगितलं आहे. इमारतीत 9 कुटुंब राहत होती. मात्र शंभर जण इमारतीत वास्तव्याला असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखालून 50 वर्षीय इसमाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. जखमींवर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरु आहेत. इमारत पडण्यामागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. तळमजल्यावरील मिठाईच्या दुकानात आग लागल्याचं समजतं.

LIVE : मुंबईतील पाकमोडिया स्ट्रीट परिसरात 4 मजली इमारत कोसळली

अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरु झालं आहे. एनडीआरएफचं 90 जणांचं पथकही घटनास्थळी दाखल झालं आहे, मात्र या भागातील रस्ते अरुंद असल्यामुळे एनडीआरएफचं साहित्य घटनास्थळी पोहचण्यात अडथळे येत होते. हुसैनीवाला इमारत कोसळल्यानंतर आजूबाजूच्या तीन इमारतींना तडे गेले होते. त्यामुळे या इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे. Bhendi-Bazar-building-collapse 'सेस'प्राप्त इमारत हुसैनीवाला इमारत ही उपकरप्राप्त (सेस) इमारत होती. म्हाडा'च्या अंतर्गत ही इमारत येत होती. 2013 साली इमारतीला नोटीसही बजावण्यात आली होती. त्यानंतर काही रहिवासी इथून निघून गेले, तर काही जण मात्र इथेच राहत होते. 'या भागातील अनेक इमारती खूप जुन्या म्हणजे कमीत कमी 50 वर्षांपूर्वीच्या आहेत. मुंबईत झालेल्या जोरदार पावसाच्या तडाख्यानं आधीच जुन्या-जर्जर झा इमारतींना धोका निर्माण झाला आहे. 50 ते 100 वर्षांपूर्वीच्या ज्या इमारतींमध्ये मालकांनी पागडी सिस्टीमवर किंवा डिपॉझीट सिस्टीमवर भाडेकरु ठेवले, ते वर्षानुवर्ष तिथे राहत आहेत. या इमारतींची दुरुस्ती करणं मालकांना परवडत नव्हतं. 1976 साली महाराष्ट्र शासनानं नवा कायदा केला आणि विशेष करांअंतर्गत या इमारती दुरुस्त कराव्यात असं म्हटलं. अशा इमारतींना सेस, म्हणजे उपकर लागू होतो. ही इमारत धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये होती. सेस इमारतींची देखभाल करणं, दुरुस्ती करणं ही जबाबदारी म्हाडाची आहे. कोसळलेली इमारत नेमकी कशी होती? इमारतीचं नोंदणीकृत नाव – हुसैनी इमारत मूळ इमारत 3 मजली, त्यावर 3 मजले नंतर बांधले तळमजल्यावर - अनिवासी गाळा/ गोडाऊन 1. पहिल्या मजल्यावर 4 खोल्या 2. दुसऱ्या मजल्यावर 1 खोली 3. तिसऱ्या मजल्यावर 1 खोली 4. चौथ्या मजल्यावर 1 खोली 5. पाचव्या मजल्यावर 1 खोली 6. सहाव्या मजल्यावर 1 खोली Bhendi-Bazar-building-collapse-sace-building गेल्या महिन्याभरातील मुंबईत इमारत कोसळण्याची ही तिसरी दुर्घटना आहे. 26 जुलै 2017 रोजी घाटकोपरमध्ये साईदर्शन ही इमारत पडली होती. तर गेल्या आठवड्यात चांदिवलीत इमारत कोसळली होती.

महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य, एका बाजूला मुंबई अध्यक्षपदी झिशान सिद्धकींची वर्णी, दुसऱ्या बाजूला कार्याध्यक्षांचा राजीनामा 
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य, एका बाजूला मुंबई अध्यक्षपदी झिशान सिद्धकींची वर्णी, दुसऱ्या बाजूला कार्याध्यक्षांचा राजीनामा 
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
Raj Thackeray : अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले

व्हिडीओ

Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: तब्बल 45 तासांनी विधान परिषदेच्या 5 पैकी 5 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवारांची यादी
तब्बल 45 तासांनी विधान परिषदेच्या 5 पैकी 5 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवारांची यादी
फडणवींसांच्या शहरात भाजपचा सलग दुसऱ्यांदा पराभव, मोदींचा भ्रमाचा भोपळा फुटला, मविआचा 3 जागांवर दणदणीत विजय, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
फडणवींसांच्या शहरात भाजपचा सलग दुसऱ्यांदा पराभव, मोदींचा भ्रमाचा भोपळा फुटला, मविआचा 3 जागांवर दणदणीत विजय, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
Varanasi MLC Election Result : पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
Nagpur MLC Election Result 2026: नागपूरमध्ये सगळ्यांना वाटलं भाजप जिंकला पण दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु होताच सगळं चित्र पालटलं, सुधाकर कोहळेंना विश्वासच बसेना, म्हणाले, जोपर्यंत.....
नागपूरमध्ये सगळ्यांना वाटलं भाजप जिंकला पण दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु होताच सगळं चित्र पालटलं, सुधाकर कोहळेंना विश्वासच बसेना, म्हणाले, जोपर्यंत.....
Raj Thackeray : अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द

Embed widget