Mumbai Bomb Threat Call Update : ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आलेल्या मुंबईत तीन ठिकाणी बॉम्ब हल्ल्याच्या धमकीच्या प्रकरणी (Mumbai Bomb Threat Call Update) आता पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आझाद मैदान पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात कलम 505 (1)(B), 170, 182 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 


अंधेरी, जुहूसह मुंबईत तीन ठिकाणी बॉम्ब हल्ल्याची धमकी देणारा फोन 18 ऑक्टोबर रोजी पोलिस हेल्पलाईनवर आला होता. फोन करणाऱ्या अज्ञात इसमानं अंधेरी इन्फिनिटी मॉल, जुहू पीव्हीआर आणि सहारा हॉटेलवर बॉम्ब हल्ला करणार असल्याची धमकी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करत धमकी 


फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी केली होती. पण हा फोन नेमका कोणी केला होता त्याची अद्याप माहिती पोलिसांना मिळू शकली नाही. या धमकीनंतर अंधेरी इन्फिनिटी मॉल (Infiniti Mall Mumbai), जुहू पीव्हीआर (Juhu PVR Mall)आणि सहारा हॉटेलची (Sahara Hotel) सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. या ठिकाणी CISF आणि BDDS ची टीम तैनात आहे. तसेच या परिसराची कडेकोट तपासणी पोलिसांनी सुरू केली आहे.


अंधेरी येथील इनफिनिटी मॉल (Infiniti Mall Mumbai), जूहू येथील पीव्हीआर (PVR Mall) आणि सहारा हॉटेल (Sahara Hotel) एअरपोर्ट  या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी असते. एका अज्ञात व्यक्तीनं मंगळवारी रात्री साडेदहा वाजता मुंबई पोलीस हेल्पलाईन क्रमांक 112 वर कॉल करत मुंबईमध्ये तीन ठिकाणी बॉस्मस्फोट होणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी लगेच या ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली. तसेच मुंबईतील इतर गर्दीच्या ठिकाणीही सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. 


दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेता मुंबई पोलिस अधिक सतर्क झाले आहेत. मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी, तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.