Mumbai Boat Accident : मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ (Gateway Of India Boat Accident) एलिफंटाला जाणाऱ्या नीलकमल बोटीच्या अपघाताचा आजचा चौथा दिवस आहे. मात्र, तरीही बोट अपघातात बुडालेल्या मृतांचा शोध अद्याप सुरुच आहे. आतापर्यंत 14 मृत व्यक्तींचा शोध लागला होता. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, आज (शनिवारी) सकाळी मिसिंग असलेल्या 15 व्या मृताचा देखील शोध लागला आहे. 


मुंबई पोलिस आणि नेव्हीसह एजंन्सीने या घटनेचा शोध लावला आहे. यामध्ये आज 15 व्या मृत व्यक्तीचा शोध लागला आहे. मुंबई किनारपट्टीवर बोट आणि नौदलाचे जहाज यांच्यात झालेल्या धडकेने बेपत्ता झालेल्या सात वर्षाच्या मुलाचा मृतदेह तीन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर आज (शनिवारी) सकाळी सापडला. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. 


गोव्याच्या मापसा येथील वास्तव्यास असलेल्या पठाण कुटुंबातील काल झालेल्या बोट दुर्घटनेत सखीना अशरफ पठाण यांचा मृत्यू झाला. या बोटीवर अशरफ पठाण सखीना पठाण त्यांची दोन मुल आणि मृत सखीना पठाण यांची बहीण सोनाली होते. या अपघातात अशरफ पठाण त्यांचे 10 महिन्याचे लहान मूल आणि मेव्हणी सोनाली बचावली. तर सखीना पठाण यांचा मृत्यू झाला आहे तर त्यांचा 7 वर्षाच्या जोहान पठाणचा मृतदेह आज सापडला आहे. 


बोट अपघातातील मृतांची नावे :


1. महेंद्रसिंग शेखावत (नौदल)
2. प्रवीण शर्मा
3. मंगेल (नौदल बोट कर्मचारी)
4. मोहम्मद रेहान कुरेशी (प्रवासी जहाज)
5. राकेश नानजी अहिरे (प्रवासी जहाज)
6. साफियाना पठाण
7. माही पावरा (3 वर्ष)
8. अक्षता राकेश अहिरे
9. मिथु राकेश अहिरे (8 वर्ष)
10. दीपक व्ही


11. हंसाराम भाटी
12. जोहान अशरफ पठाण


(दोन महिला यांची अद्याप ओळख पटलेली नाही.)


नेमकं काय घडलं?


प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या नीलकमल बोटीला इंडियन नेव्हीच्या वेगवान स्पीड बोटीने जोरदार धडक दिली. या स्पीड बोटीने आधी एक मोठा राऊंड मारला आणि नंतर तिने नीलकमल या बोटीला समोरून धडक दिली. या जोरदार धडकेत नीलकमल बोट बुडाली. अपघातावेळी बोटीमध्ये शंभरच्या वर प्रवासी आणि 5 बोटीचे सदस्य होते. नेव्हीच्या स्पीड बोटीचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचं सांगण्यात येतंय. दुपारी 4 वाजण्याच्या सुमाराला हा अपघात घडला.             


हे ही वाचा : 


Mumbai Boat Accident : नीलकमल बोटीखालून अचानक हात बाहेर आला अन् 14 वा मृतदेह सापडला; 26 तासांनी हंसाराम भाटींचं शव मिळालं