मुंबई : कोरोना प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी (17 सप्टेंबर 2021) मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड 19 लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष लसीकरण सत्र राबवण्यात आलं. त्यानुसार शुक्रवारी एकूण 1 लाख 27 हजार 351 महिलांना लस दिली गेली. यात महिलांना लसीकरण केंद्रावर थेट येऊन (वॉक इन) कोरोना लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेण्याची मुभा देण्यात आली होती.


महिला लसीकरण विशेष सत्रात काल एकूण 1 लाख 27 हजार 351 लसी देण्यात आल्या. त्यामध्ये महापालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रावर एकूण 1 लाख 07 हजार 934 लसी देण्यात आल्या. 


 






कोविड-19 विषाणू प्रतिबंधक लसीकरण अधिकाधिक वेगानं आणि सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत नेण्यासाठी मुंबई महानगरपालिका देखील प्रयत्नशील आहे. त्यासाठी विशेष सत्र राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष कोविड लसीकरण सत्र शुक्रवारी सकाळी 10.30 ते सायंकाळी 6.30 या वेळेत राबवण्यात आलं.


मुंबईतील सर्व 227 प्रभागांमधील लसीकरण केंद्र आणि त्यासोबत सर्व शासकीय आणि महानगरपालिका रुग्णालयं आणि कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रावर थेट येऊन (वॉक इन) महिलांना कोविड लस घेता येईल असं व्यवस्थापन करण्यात आलं होतं. फक्त महिलांना लस दिली जाणार असल्या कारणानं काल ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात आली आहे.


संबंधित बातम्या :