मुंबई  : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. कालच्या तुलनेत कोरोना रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाली आहे, मात्र काही दिवसांपासून वाढलेली आकडेवारी चिंतेचा विषय बनत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 434 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 387 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,13,992 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. मागील 24 तासात मुंबईत एकूण 40 हजार 443 नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली.


Maharashtra Corona Update : राज्यात आज 3,586 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 67 रुग्णांचा मृत्यू


मुंबईत गेल्या 24 तासात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4658 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1289 दिवसांवर गेला आहे. मुंबईतील सध्या 38 इमारती सील करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत अॅक्टिव्ह कंटेनमेंट झोन शून्य आहेत.






मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. शहरात करण्यात आलेल्या पाचव्या सेरो सर्वेत 86 टक्के लोकांमध्ये कोरोना विरोधातील अँटीबॉडीज आढळल्या आहेत. यातील काही लोकांनी व्हॅक्सिन घेतलं होतं. लस घेतलेल्या 90 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या तर काहींनी व्हॅक्सिन घेतलेलं नव्हतं अशा 80 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत.


Corona Vaccination : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी देशात लसीकरणाचा विक्रम; एकाच दिवसात दोन कोटी नागरिकांना डोस


या सर्वेत 24 वॉर्डमध्ये 8 हजार 600 रक्ताचे नमुने तपासण्यात आले आहे. सर्वेत समोर आलेल्या माहितीनुसार अँटीबॉडीज मिळण्याचं प्रमाण स्त्री-पुरुषांमध्ये समसमान आहे. वयोगटानुसार 18 वर इक्वल डिस्ट्रिब्युशन आहे. झोपडपट्ट्या आणि इमारतीत जास्त फरक नाही. दरम्यान असं जरी असलं तरी नियमांचे पालन केले पाहिजे, असे आरोग्य विभागाने म्हटलं आहे.