नवी दिल्ली : शुक्रवारी (17 सप्टेंबर) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून देशातील कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाने एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. शुक्रवारी देशात एकाच दिवशी कोरोना लसीचे 2.5 कोटीहून अधिक डोस देण्यात आले. देशात जगातील सर्वात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम सुरु असून आतापर्यंत चार वेळा एकाच दिवशी एक कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे.
या आधी एकाच दिवशी कोरोनाच्या सर्वाधिक लसी देण्याचा विक्रम चीनच्या नावावर होता. चीनने एकाच दिवशी 2.47 कोटी लसी वितरित केल्या होत्या. तो विक्रम भारताने मोडला आहे. भारताने हा विश्वविक्रम केल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी दिली आहे.
466 डोस प्रति सेकंद
भारतात जगातील सर्वात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम सुरु आहे. तो आता जगातील सर्वात जलद लसीकरणाचा कार्यक्रमही बनला आहे. शुक्रवारी देशामध्ये प्रतिसेकंद 466 डोस देण्यात आले आहेत. याचा अर्थ प्रति मिनीटाला 28 हजार डोस तर प्रति तासाला 17 लाख डोस देण्याचा विक्रम करण्यात आला.
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने देशात अनेक ठिकाणी कोरोनाच्या लसीकरणाचे विशेष कार्यक्रम राबवण्यात आले.
महत्वाच्या बातम्या :