मुंबई : एबीपी माझातर्फे माझा विघ्नहर्ता पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. जुलै महिन्यात महाराष्ट्राच्या अनेक भागात आलेल्या महापुरात स्वत:चा जीव धोक्यात घालून इतरांच्या मदतीला धाऊन जाणाऱ्या आणि अनेकांसाठी विघ्नहर्ता ठरणाऱ्यांचा या निमित्ताने गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, भाजप नेते आशिष शेलार, सिद्धीविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर आणि अभिनेत्री निवेदिता सराफ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

जुलै महिन्यात महाराष्ट्राच्या अनेक भागात आलेल्या महापुरात स्वत:चा जीव धोक्यात घालून अनेकांनी लोकांना काळाच्या जबड्यातून बाहेर काढत जीवनदान दिलं आहे. ही लोकं नागरिकांसाठी विघ्नहर्ता म्हणूनच आली होती. या सर्व लोकांचा एबीपी माझातर्फे गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, भाजप नेते आशिष शेलार, सिद्धीविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर आणि अभिनेत्री निवेदिता सराफ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सन्मान करण्यात आलेल्या मान्यवरांची नावे

  • शुभम काटकर, कोल्हापूर
  • रत्नदुर्ग माऊंटेनियर्स, रत्नागिरी
  • हर्षल सुदर्शने, कोल्हापूर
  • भगवान कोंढाळकर, सातारा
  • प्रकाश दाभेकर, महाड
  • आप्पा आणि प्रशांत दाभोळकर, चिपळूण
  • रणजित राजे शिर्के, चिपळूण
  • प्रवीण पाकळे. पेढेगाव, चिपळूण
  • साक्षी दाभेकर, रायगड

या दहा विघ्नहर्त्यांचा सन्मान करण्यात आला. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शेखर निरंजन भाकरे आणि ग्रुपने गणेश वंदना सादर केली.