एक्स्प्लोर

Rustomjee Crown Demolition : प्रभादेवीतील हायप्रोफाईल 'रुस्तमजी क्राऊन'वर BMC चा हातोडा! मंत्री, आमदारांचे निवास असलेल्या टॉवरमधील 9 फ्लॅटवर तोडक कारवाई

Mumbai Rustomjee Crown Demolition : प्रभादेवी येथील आलिशान 'रुस्तमजी क्राऊन' टॉवरमधील ९ सदनिकांमधील अनधिकृत बांधकामांवर पालिकेने तोडक कारवाई केली आहे. या टॉवरमध्ये मंत्री आणि आमदारांचे फ्लॅट्स आहेत.

BMC Action On Rustomjee Crown : मुंबईतील प्रभादेवी, गोखले रोड परिसरातील 'रुस्तमजी क्राऊन' या उच्चभ्रू आणि टोलेजंग इमारतीतील अनधिकृत बांधकामांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) अखेर मोठा हातोडा चालवला आहे. इमारतीच्या मंजूर आराखड्याचे उल्लंघन करून तसेच चटई क्षेत्र निर्देशांकाच्या (FSI) नियमांना बगल देऊन करण्यात आलेल्या बेकायदेशीर फेरबदलांविरोधात पालिकेने 24 आणि 25 ऑगस्ट रोजी धडक पाडकामाची कारवाई केली. या दोन दिवसांत एकूण 9 सदनिकांमधील अनधिकृत बांधकामे पूर्णपणे पाडण्यात आल्याची माहिती आहे. 

आरटीआय कार्यकर्ते संतोष दौडंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या टॉवरमधील तब्बल 138 फ्लॅटधारकांना पालिकेकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या आलिशान इमारतीत मंत्री संजय राठोड, त्यांच्या पत्नी शीतल राठोड, माजी आमदार सदा सरवणकर यांचे चिरंजीव समाधान सरवणकर यांचे फ्लॅट्स आहेत. तसेच माजी मंत्री दीपक केसरकर हेदेखील याच टॉवरमध्ये भाड्याने राहत आहेत.

Rustomjee Crown Illegal Construction : लॉबी, डक्ट आणि शाफ्टवर मारला डल्ला

कारवाईदरम्यान पालिकेच्या अधिकाऱ्यांना या इमारतीत धक्कादायक प्रकार आढळले. फ्लॅटधारकांनी सामाईक मोकळ्या जागांवर अतिक्रमण करून आपल्या फ्लॅटचा आकार वाढवला होता.

सामाईक लॉबी बंदिस्त : लिफ्ट आणि लॉबीचा सामाईक भाग लाकडी साहित्य आणि सिपोरेक्स विटांचा वापर करून अनधिकृतरीत्या बंदिस्त करून राहत्या जागेत जोडला गेला.

किचन डक्टचा अनधिकृत वापर : किचन डक्टचा भाग एम.एस. प्लेट्सच्या (M.S. Plates) मदतीने बंद करून स्वयंपाकघराचा आकार वाढवण्यात आला.

व्हेंटिलेशन शाफ्ट बनवली 'स्टोअर रूम' : हवा खेळती राहण्यासाठी असणाऱ्या व्हेंटिलेशन शाफ्टवर एम.एस. प्लेट्स टाकून त्याचा वापर थेट स्टोअर रूम म्हणून केला जात होता.

250 कोटींचे अतिक्रमण : लिफ्टच्या बाजूची मोकळी जागा फ्लॅटमध्ये समाविष्ट करून हडपलेल्या या जागेचे बाजारमूल्य 250 कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.

BMC Demolition Squad : कारवाईसाठी मोठे मनुष्यबळ तैनात

या 63 मजल्यांच्या तीन इमारतींपैकी दोन इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र (OC) मिळालेले आहे. पालिकेने आधी जारी केलेल्या नोटिसा आणि सकारण आदेशांनुसार ही धडक कारवाई केली. ही कारवाई सुरळीत पार पाडण्यासाठी पालिकेचे 15 कामगार, 2 मुकादम, 4 अभियंते आणि 8 पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा घटनास्थळी तैनात करण्यात आला होता. 

हायप्रोफाईल नेत्यांची नावे जोडल्या गेलेल्या या टोलेजंग इमारतीवर पालिकेने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे मुंबईतील बांधकाम आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

ही बातमी वाचा :

About the author अजय माने

अजय माने
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
Advertisement

व्हिडीओ

Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
Satara DCC Bank : दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं, मकरंद पाटील म्हणाले महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आल्यानं जिल्ह्यात चांगला संदेश गेला...
दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, निवडणूक बिनविरोध,वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं: मकरंद पाटील
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
Embed widget