एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईत लवकरच 1200 ठिकाणी हॉटस्पॉट
मुंबई: मुंबईत लवकरच 1200 ठिकाणी हॉटस्पॉट उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज सीसीटीव्ही कंट्रोल रुमचं अनावरण करण्यात आलं, यावेळी त्यांनी माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी इतरही काही चांगल्या योजनांची घोषणा केली, यामध्ये रस्ता आणि सोसायट्यांमध्ये लागलेले सीसीटीव्ही सरकारी यंत्रणेसोबत जोडणार, मुंबईच्या विविध भागात 1200 हॉस्पॉट तयार करणे, 29 हजार ग्रामपंचायती डिजिटल करणे, मोबाईलवरुनच पोलीस ठाण्यात तक्रार करणे, अशा घोषणांचा यामध्ये समावेश आहे.
''2009 ते 2014 पर्यंत प्रत्येक अधिवेशनात आम्ही सीसीटीव्हींचा प्रश्न मांडत होतो, पण त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं, मात्र आता मुंबईला तिसरा डोळा प्राप्त झाला,'' असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
तसेच कोपर्डीची घटना अवैध दारुमुऴे झाली होती, त्यामुळे अशाप्रकारच्या दारुविक्रीवर बंदी घालण्याचा विचार मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे त्यासंदर्भात दिशा देण्याचं काम करत असल्याचंही त्यांनी म्हटलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement