मुंबई : नवी मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी  आढावा घेतला. नवी मुंबईत नवं आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्याच काम सध्या जोरदार सुरु आहे. तसेच  मुंबई आणि आजूबाजूच्या शहरातली काम आगामी निवडणुकांपूर्वी  करण्यावर शिंदे फडणवीस सरकारने भर दिल्याच पाहायला मिळतं आहे. 


आगामी  निवडणुकींसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून भाजप व शिंदे गटाने राज्यातील मुंबईत आणि बाजूच्या शहरातील विकास कामांचा धडाकाच लावला आहे. आज एकाच दिवशी तिरुमला तिरुपती देवस्थानम श्री व्यंकटेश्वर स्वामी वारी मंदिर, नवी मुंबई भूमिपूजन आणि नवी मुंबई इंटरनॅशनल विमानतळ येथील टर्मिनल इमारत आणि धावपट्टी साईटला भेट देत, मॉडेल रुमची पाहणी मंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हा प्रकल्प देखील 2024 मध्ये पूर्ण होऊन लोक त्यातून प्रवास करतील असा विश्वास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला   


 गेल्या 11 महिन्यापूर्वी स्थापन झालेले शिंदे फडणवीस सरकार राज्यात अनेक शहरांमध्ये पायाभूत सोयी सुविधांसह मोठे प्रकल्प पूर्ण करण्याच्या  प्रयत्नात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतय. पायाभूत सुविधा आणि इन्फ्रा प्रकल्प वेळेत मार्गी लागावेत यासाठी योग्य समन्वय, त्यासाठी कालबद्ध नियोजन करा अशा सूचना प्रशासन आणि अधिकारी सर्वांना मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी या गेल्या काही महिन्यात दिले असल्याचे समजते. मात्र विरोधक हे फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करत आहेत अशी टीका करत आहेत.


 कोणती  कामे  यावर्षात आगामी निवडणुकांपूर्वी शिंदे फडणवीस करण्याच्या मार्गावर?



  • शिवडी नावाशेवा सेतू  मार्ग 

  • मुंबई मेट्रो

  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

  • मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक

  • मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉर

  • मुंबई कोस्टल रोड

  • दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर


 यासारखे अनेक मोठे प्रकल्प आणि पायाभूत सोयी सुविधा प्रकल्प पूर्ण करण्यावर शिंदे फडणवीस सरकारची भर आहे.


गेल्या काही महिन्यांमध्ये शिंदे फडणवीस सरकारने  अनेक महत्त्वाच्या कामांना गती दिली आहे. यामध्ये प्रत्येक शहरातील पायाभूत सोयीसुविधांसह अनेक महत्त्वाचे प्रकल्प या काही वर्षांमध्ये पूर्ण करण्याचा शिंदे फडणवीस सरकारचा मनसुबा आहे. लोकांना काम दाखवून आगामी काळात मत मागता येतील हे यामागे कारण असल्याचं या कामातून स्पष्ट होत आहे.