Mumbai Drugs Case Exclusive : आपण एनसीबीसाठी ट्रम्प कार्ड असून र्यन खान प्रकरणी कुठेही वाच्यता करायची नाही असं धमकावत धवल भानुशाली, मनिष भानुशाली आणि दिल्लीच्या एका व्यक्तीने आपल्याला मारहाण केली असल्याचा गौप्यस्फोट सुनिल पाटील यांनी केला आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी चर्चेत आलेल्या सुनिल पाटील यांनी एबीपी माझाला एक्स्लुझिव्ह मुलाखत दिली आहे. 


सुनिल पाटील म्हणाले की, "आपल्याला चार-पाच दिवसांपूर्वी मनिष भानुशाली आणि धवल भानुशाली यांनी दिल्लीला बोलावलं. मी त्यावेळी अहमदाबादमध्ये होतो. दिल्लीमध्ये त्यांनी मला एका हॉटेलमध्ये ठेवलं. त्यावेळी मला कुठेही बाहेर जायचं नाही, तू एनसीबीसाठी ट्रम्प कार्ड आहेस, कुणाशीही बोलायचं नाही असं मला सांगण्यात आलं. दुसऱ्या दिवशी मला मारहाण करण्यात आली."


मुंबई ड्रग्ज प्रकरणी आर्यन खान आणि अरबाज खान यांचं एनसीबीच्या लिस्ट मध्ये नाव नव्हतं असाही गौप्यस्फोट सुनिल पाटील यांनी केला आहे. या प्रकरणाची टीप आपल्याला मिळाली नव्हती तर निरज यादव या मध्य प्रदेशमधील भाजपच्या कार्यकत्यांने याची टीप मनिष भानुशालीला दिली होती असंही सुनिल पाटील म्हणाले. 


सुनिल पाटील म्हणाले की, "आर्यन खान केस प्रकरणाशी आपला काही संबंध नाही, आपण फक्त यामध्ये 50 लाखाची डील केली होती. नंतर ती डील कॅन्सल झाल्याचं सॅम डिसुझाने सांगितलं. मनिष भानुशालीचे गुजरातमधील भाजपच्या मंत्र्याशी जवळचे संबंध असल्याचं सुनिल पाटील यांनी सांगितलं आहे."


एकूणच आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलं असून रोज या प्रकरणाशी संबंधित नवनवे खुलासे होतं आहेत. 


महत्वाच्या बातम्या :