एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुख्यमंत्र्यांमध्ये खडसेंवर कारवाई करण्याची हिंमत नाही : दमानिया
खडसेंकडे सगळ्यांची अंडी-पिल्ली असल्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची हिंमत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये नाही, असा दावा अंजली दमानिया यांनी केला.
मुंबई : एकनाथ खडसे यांच्याविरोधात कारवाई करण्याची हिंमत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये नाही, असा थेट घणाघात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंविरोधात अश्लील टिप्पणीची तक्रार करुनही कारवाई होत नसल्याने दमानियांनी हा आरोप केला.
खडसे म्हणाले होते 'मी बोललो तर महाराष्ट्रात राजकीय भूकंप येईल'. खडसेंकडे सगळ्यांची अंडी-पिल्ली असल्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची हिंमत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये नाही, असं दमानिया म्हणाल्या. पुरोगामी महाराष्ट्रात, मुंबईत एकही महिला सुरक्षित नाही असं म्हणावं लागेल, असंही त्या म्हणाल्या.
एकनाथ खडसे यांना तातडीने अटक करा : अंजली दमानिया
आपण मुख्यमंत्री, देवेन भरती, एसीपी, डीसीपी अशा सगळ्यांविरोधात कोर्टात जाऊन लढणार असल्याचंही दमानियांनी सांगितलं. एक महिलेवर अन्याय झाला तरीही एफआयआर दाखल करत नाही. ही कर्तव्यात हलगर्जी असल्याचा दावाही दमानियांनी केला. खडसेंविरोधात दमानियांच्या तक्रारीनंतर जळगाव पोलिस प्रकरणाची चौकशी करणार आहेत. मात्र मुंबईत एफआयआर दाखल होणार नसल्याची माहिती आहे.दमानियांवर कुठलीही अश्लील टीका नाही, खडसेंचं स्पष्टीकरण
काय आहे प्रकरण? एकनाथ खडसे यांनी अश्लील टिप्पणी केल्याचा आरोप करत अंजली दमानिया यांनी खडसेंना तातडीने अटक करण्याची मागणी केली होती. मात्र आजवर कुठल्याही स्त्रीचा आपण अनादर केला नाही. शिवाय अंजली दमानियांविषयी कुठलंही आक्षेपार्ह विधान केलं नसल्याचं स्पष्टीकरण एकनाथ खडसे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलं आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्राईम
करमणूक
Advertisement