मुंबई : मागील चार वर्षांमध्ये मुंबईच्या (Mumbai) हवेची (Air) गुणवत्ता खालावली असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतयं. तर मुंबईच्या हवेच्या तुलनेत दिल्ली (Delhi) आणि लखनौच्या हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याचं चित्र आहे. साधारणपणे ऑक्टोबर ते मार्च दरम्यान हलेची गुणवत्ता ही खालावत जाते. त्यामुळे या कालावधीमध्ये हवेच्या गुणवत्तेचं परिक्षण करण्यात येतं. मागील चार वर्षात म्हणजेच 2019 ते 2023 या कालावधीमध्ये हवेची गुणवत्ता कमी होत चालल्याचं चित्र आहे.
देशातील काही महत्त्वाच्या शहरांच्या हवेच्या गुणवत्तेसंदर्भात अभ्यास करण्यात आला आहे. ज्यामध्ये आॅक्टोबर ते मार्च दरम्यान कार्सिनोजेनिक तत्व असलेल्या पीएम 2.5 चा स्तर दिल्ली, मुंबई, बंगळुरु, कोलकाता,लखनौ आणि पटण्यात अधिक असल्याचं चित्र आहे.
मुंबईची हवा 'मॉडरेट' श्रेणीत
मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेची पातळी ही आतापर्यंत चांगल्या श्रेणीमध्ये गणली जात होती. मात्र आता हीच हवा मॉडरेट श्रेणीमध्ये गणली जात असल्याचं दिसत आहे. मुंबईतील प्रदुषणाची पातळी देखील कायम आवाक्यात असल्याचं चित्र असतं. पण तरीही मुंबईतील खालालवलेली हवेची पातळी ही मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा तर नाही ना असा सवाल सध्या उपस्थित केला जातोय. त्याचप्रमाणे मुंबईकरांना आता काळजी घेण्याची गरज निर्माण झाल्याचं देखील म्हटलं जात आहे.
दिल्लीची अवस्था चिंतेत टाकणारी
मागील वर्षात भारतातील सर्वाधिक दहा प्रदूषित शहरांची यादी पाहता दिल्ली आणि या शहरालगतच्या नॅशनल कॅपिटल रिजनमधील (एनसीआर) शहरे ही देशात सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या अव्वल स्थानी होती. दिल्लीच्या हवेची गुणवत्ता किरकोळ सुधारली आहे. पण 1 ऑक्टोबर 2022 ते 30 सप्टेंबर 2023 हा काळ पाहता दिल्ली हे सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून नोंदवले गेले आहे. दिल्लीची पीएम 2.5 संपृक्तता 100.1 मायक्रोग्रॅम/क्युबिक मीटर (μg/m3) इतकी मोजली गेली आहे. दरम्यान सरकारच्या लेखी ‘चांगली’ हवा अशी नोंद असलेल्या प्रमाणाच्या तिप्पट ती आहे. तसेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने आखून दिलेल्या सुरक्षित मर्यादेच्या 20 पट अधिक आह
दिल्लीच्या हवेत किरकोळ सुधारणा
दिल्लीच्या हवेची गुणवत्ता किरकोळ सुधारली आहे. पण 1 ऑक्टोबर 2022 ते 30 सप्टेंबर 2023या काळात दिल्ली हे सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून नोंदवले गेले आहे. दिल्ली खालोखाल बिहारची राजधानी पाटणाची हवेची गुणवत्ता 99 99.7 (μg/m3) इतकी मोजली गेली आहे. दरम्यान पाटणाच्या हवेची गुणवत्ता ही मागील वर्षीच्या तुलनेत 24 टक्क्यांनी घसरलीये.
देशातील सर्वाधिक दहा प्रदुषित शहरांच्या यादीमध्ये दिल्ली एनसीआर आणि बिहार राज्यातील सात शहरांचा समावेश करण्यात आला आहे. तर ही सात प्रदुषित शहरे प्रामुख्याने गंगेच्या खोऱ्यातील मैदानी प्रदेशात वसलेली आहे. मिझारोम राजधानी ऐझ्वाल या शहराची हवेची गुणवत्ता सर्वाधिक चांगली आहे. तर येथील पीएम 2.5 स्तर हा 11.1 (μg/m3) इतका मोजला गेलाय.