मुंबई:  हार्बर रेल्वे (Harbour local) मार्गावरील रेल्वेचा घोळ सुरुच आहे. गेल्या चार दिवसांपासून  हार्बर रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या त्रासात भर पडली आहे. अजूनही हार्बर  रेल्वे सुरळीत नाही.  बेलापूर ते पनवेल ट्रान्स हार्बर लोकल धावणार नसल्याची स्थानकात उद्घोषणा करण्यात आली आहे. केवळ ठाणे ते बेलापूर पर्यंतच ट्रान्स हार्बर लोकल धावणार आहे.  अचानक लोकल रद्द केल्याने प्रवासी गोंधळ निर्माण झाला आहे. केवळ ठाणे ते बेलापूर पर्यंतच ट्रान्स हार्बर लोकल धावणार आहे.  


गेल्या काही दिवसांपासून रेल्वेचा अनागोंदी कारभार समोर येत आहे.  लोकल रद्द करण्याची कोणतीही पूर्वसूचना नाही, प्रसार माध्यमांना माहिती दिली जात नाही. जनसंपर्क विभागाला वारंवार विचारून देखील कोणतेही कारण सांगितले जात नाही. पनवेल स्टेशनचे प्लॅटफॉर्म नंबर बदलले ते देखील सांगितले नव्हते, 38 तासांचा मेगब्लॉक अचानक वाढवला तो देखील सांगण्यात आला नव्हता.