मुंबई : मुंबईची हवा दिल्लीपेक्षाही (Mumbai Air Pollution) खराब स्थितीत पोहचली आहे. ठाणे, नवी मुंबईतील हवाही खराब आहे. विलेपार्ले, चकाला परिसरातील हवेची स्थिती बुधवारी सायंकाळी अतिधोकादायक असल्याची नोंद झाली आहे. यानंतर मास्क सक्तीने वापरण्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेने (BMC) या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. मास्क वापरण्याबाबत कोणतंही आवाहन नाही, मुंबई महापालिकेने स्पष्टीकरण दिले आहे.
वातावरण बदलांमुळे बृहन्मुंबईसह मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर सध्या विपरित परिणाम आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर समाज माध्यमांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे वृत्त प्रकाशित झाले आहे.मात्र या बातम्यांमध्ये तथ्य नसूनमास्क वापरण्याबाबत कोणतंही आवाहन महानगरपालिकेने केलेले नाही, असे परिपत्रक काढत स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई महानगरपालिकेचे स्पष्टीकरण
बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, हवेची गुणवत्ता विपरित होत असल्याचे आढळल्यानंतर याअनुषंगाने शासनाच्या संबंधित विभागांशी समन्वय साधून उपाययोजनांविषयी कार्यवाही विचाराधीन आहे. त्यामुळे अद्यापपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मास्क वापरण्यासंदर्भात नागरिकांना कोणतेही आवाहन करण्यात आलेले नाही किंवा मार्गदर्शक तत्वेही अद्याप जारी करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे समाज माध्यमांमधून बृहन्मुंबई महानगरपालिकेचा उल्लेख करुन प्रकाशित किंवा प्रसारित केलेले वृत्त निराधार व अयोग्य आहे.
हवामान आणि तत्संबंधीत सर्व यंत्रणांशी बृहन्मुंबई महानगरपालिका समन्वय साधत असून त्यांच्याकडून प्राप्त निर्देशांनुसार यथोचित उपाययोजना, निर्णय, आदींची माहिती नागरिकांपर्यंत वेळोवेळी पोहोचविण्यात येईल, असे नम्र आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
मुंबईत अँटी स्मोग गन
मुंबईत काल अंधेरी आणि नवी मुंबई परिसरात हवा गुणवत्ता निर्देशांक 300 पार होता. मुंबईतील वाहतूक व्यवस्था, सुरु असलेली बांधकामं, मेट्रोची कामं यामुळे धुळीच्या कणांमुळे मोठी भर पडली आहे हवेच्या प्रदूषणामुळे श्वसनाचे विविध रोग, दमा, टीबी, केंसर ,सर्दी, खोकला, डोळे, त्वचा, आणि हृदय रोगांच्या रुग्णांना त्रास वाढतो. मुंबई शहरात धुळीकणांचे प्रमाण अधिक वाढलेले आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर देखील दुष्परिणाम होतोय. त्यातच आता महापालिकेकडून हे रोखण्यासाठी अँटी स्मोग गन लावण्यात येणार असून त्यामुळे प्रदूषण टाळता येणार आहे. शहरात रोज हजारो लोक आपल्या स्वत:च्या वाहनाने प्रवास करतात. त्यामुळे हवेतील वातावरणात प्रचंड प्रमाणात धुलीकण पसरतात
हे ही वाचा :