Pune Air Pollution : पुण्यात (pune) वायू प्रदुषणात (air pollution) सातत्याने वाढ होत असल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील हवेची खराब श्रेणीत पोचली असन मुंबई, दिल्लीच्या तुलनेत पुण्याची हवा जास्त खराब झाल्याचे पाहायला मिळाले. हेवेतील अतिसूक्ष्म धुलीकणांचे प्रमाण (पार्टिक्युलेट मॅटर 2.4) अधिक आहे.
वाढलेल्या प्रदूषणामुळे श्वसनाचा आजार असलेल्या नागरिकांना आरोग्यासंबंधीचा धोका वाढला आहे. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक 146 वर तर पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक 178 वर गेला आहे. हिवाळ्यात मागील चार वर्षात मुंबईतील हवा गुणवत्ता दिल्लीपेक्षा वाईट स्थिती जात असल्याचा अनेक संस्थांचा अभ्यास आहे. मुंबई आणि पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक सामान्य स्थिती असला तरीही मागील काही दिवसात हवेची गुणवत्ता प्रचंड खालवल्याचं चित्र सध्या दिसत आहे.
दिल्लीची हवा चांगली
मुंबई आणि पुण्यापेक्षा दिल्लीत चांगली हवेची गुणवत्ता चांगली आहेत. दिल्लीत हवा गुणवत्ता निर्देशांक 110 वर आहे. मुंबई आणि पुण्यात पीएम 2.5 कणांची मात्रा अधिक असल्याचे सफरच्या (SAFAR- The System of Air Quality and Weather Forecasting And Research अभ्यासात समोर आले आहे. पीएम 2.5 धुलिकण कार्सिनोजेनिक असल्याने श्वसनासाठी घातक आहे. कालच्या तुलनेत मुंबई आणि पुण्यात आज चांगली परिस्थिती असून निर्देशांक सामान्य स्थितीत आहे.
लोहगावचा हवा गुणवत्ता तीनशेपार
मुंबईत काल अंधेरी आणि नवी मुंबई परिसरात हवा गुणवत्ता निर्देशांक 300 पार होता. तर पुण्यातील लोहगावमधील हवा गुणवत्ता निर्देशांक 301 आणि आळंदीत एक्यूआय (AQI- Air Quality Index) 232 वर गेला आहे. हिवाळ्यात पूर्वेकडून वाहणारे वारे, सोबतच वाऱ्यांचा वेग देखील कमी असल्याने मुंबईसह पुण्यातील हवा गुणवत्ता खालवली आहे. मुंबईतील वाहतूक व्यवस्था, सुरु असलेली बांधकामं, मेट्रोची कामं यामुळे धुळीच्या कणांमुळे मोठी भर पडली आहे हवेच्या प्रदूषणामुळे श्वसनाचे विविध रोग, दमा, टीबी, केंसर ,सर्दी, खोकला, डोळे, त्वचा, आणि हृदय रोगांच्या रुग्णांना त्रास वाढतो.
प्रदूषीत हवेसाठी वाहतूक जबाबदार
तापमानात घट झाल्यावर प्रदूषणात ही वाढ नोंदवली जाते. जेव्हा तापमान जास्त असते तेव्हा वातावरणातली आर्द्रता कमी असते आणि कोरडे हवामान असते. या प्रदूषित हवेसाठी वाहतूक देखील कारणीभूत आहे. शहरात रोज हजारो लोक आपल्या स्वत:च्या वाहनाने प्रवास करतात. त्यामुळे हवेतील वातावरणात प्रचंड प्रमाणात धुलीकण पसरतात.
हे ही वाचा :