Abdul Sattar : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (Mumbai Agriculture Produce Market Committee) आवाराच्या पुनर्विकासासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे मत राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) यांनी व्यक्त केलं. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांबरोबरच व्यापारी, माथाडी यांच्यासाठीही महत्त्वाची संस्था असल्याचे सत्तार म्हणाले. सत्तार यांनी वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीस भेट दिली. यावेळी त्यांनी बाजार समितीच्या सदस्यांबरोबरच विविध व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते.
बाजार समितीच्या कार्यकक्षा वाढवण्यासंदर्भात निर्णय घेणार
मंत्री सत्तार यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध समस्या आणि अडचणींची माहिती घेतली. तसेच पुनर्विकास प्रकल्पाचीही यावेळी माहिती घेतली. त्यानंतर ते बोलत होते. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन निर्माण केली आहे. त्यामुळं त्यास प्राधान्य देण्यात यावे. नियमन मुक्तीमुळे बाजार समितीच्या उत्पन्नात घट झालेली असली तरी उत्पन्न वाढवण्यासाठी समितीनं उपाययोजना सुचवाव्यात असेही अब्दुल सत्तार म्हणाले. तसेच बाजार समितीच्या कार्यकक्षा वाढवण्यासंदर्भात शासनस्तरावर निर्णय घेण्यात येईल. तसेच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवाराच्या पुनर्विकासासाठी लवकरच निर्णय घेणार असल्याचं अब्दुल सत्तारांनी सांगितलं.
शंभर दिवसात अंतिम निर्णय घेण्यात येणार
बाजार समितीच्या आवारातील गाळे अतिधोकादायक झाले आहेत. त्याचा पुनर्विकास करण्याची आवश्यक आहे. त्यासाठी बाजार समिती सदस्य, व्यापारी, माथाडी कामगार यांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन पुनर्विकासासंदर्भात तसेच इतर विषयांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी शासनस्तरावर लवकरच बैठक घेण्यात येईल. याप्रश्नी शंभर दिवसात अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सत्तार म्हणाले. बाजार समितीमध्ये मूलभूत पायाभूत सुविधा पुरविण्याची आवश्यकता आहे. तसेच बाजार समितीने आपल्या कामकाजात संगणकीय प्रणालीचा वापर वाढवावा, असेही अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अब्दुल सत्तार यांनी बाजार समितीच्या सदस्यांबरोबरच विविध व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी तसेच शेतकऱ्यांशी देखील तर चर्चा केली. यावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक, उपसभापती धनंजय वाडकर, सदस्य आमदार शशिकांत शिंदे, सचिव भुसारे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान, नियमन मुक्तीमुळे बाजार समितीच्या उत्पन्नात घट झालेली असली तरी उत्पन्न वाढवण्यासाठी समितीनं उपाययोजना सुचवाव्यात असेही अब्दुल सत्तार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: