एक्स्प्लोर
परदेशी तरुणीशी गैरवर्तन, अभिनेता आणि मर्चंट नेव्ही अधिकारी अटकेत
तक्रारदार कॅनेडियन तरुणी आणि तिचा कॅनेडियन बॉयफ्रेण्ड मुंबईत फिरायला आले होते. त्यांची वांद्र्यातील एका डिस्कोमध्ये आरोपींशी ओळख झाली. तक्रारदार राहण्यासाठी हॉटेल शोधत होते, मात्र आरोपींनी त्यांना आपल्या घरी राहण्याची विनंती केली.

मुंबई : कॅनेडियन तरुणीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका बॉलिवूड अभिनेत्यासह आणखी एकाला अटक केली आहे. अभिनेता साहेब सिंह आणि मर्चंट नेव्हीतील अधिकारी अमर चौधरीला अटक करण्यात आली आहे. अमर चौधरीच्या फ्लॅटमध्ये दोघांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. तरुणी आणि तिच्या बॉयफ्रेण्डने गोरेगावमधील बांगुरनगर पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सहा तारखेला दोघांना बेड्या ठोकल्या. तक्रारदार कॅनेडियन तरुणी आणि तिचा कॅनेडियन बॉयफ्रेण्ड मुंबईत फिरायला आले होते. त्यांची वांद्र्यातील एका डिस्कोमध्ये आरोपींशी ओळख झाली. तक्रारदार राहण्यासाठी हॉटेल शोधत होते, मात्र आरोपींनी त्यांना आपल्या घरी राहण्याची विनंती केली. चौघं जण कारने आरोपींच्या मालाडमधील फ्लॅटमध्ये आले. तरुणी झोपलेली असताना साहिब आणि अमर यांनी तिचे कपडे काढण्याचा आणि नकोसे स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोघांनी जवळच्या पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
Before You Go
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ






















