Mumbai AC Local : मध्य रेल्वेवरील एसी लोकलच्या (Mumbai AC Local) फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अतिरिक्त एसी लोकल साध्या लोकल बंद करून चालवण्यात येणार आहेत त्यामुळे याविरोधात आता प्रवासी संघटना आक्रमक झालेत आहेत. पश्चिम रेल्वेवर देखील अशाच प्रकारे साध्या लोकलच्या जागी एसी लोकल चालवल्यामुळे प्रवासी संतापले होते. मध्य रेल्वेवर काही महिन्यांपूर्वी एसी लोकल सुरू करत असताना हेच चित्र बघायला मिळालेलंल. मात्र प्रवाशांचा विरोध न जुमानता रेल्वे प्रशासनाने आपले निर्णय कायम ठेवलेत. एसी लोकलमुळे सर्वसामान्यांचा खोंळबा होत असून एसी लोकलचे दरही सामन्यांना न परवडणारे आहेत.
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक यांनी मध्य रेल्वे मार्गावर आणखीन दहा वातानुकूलित लोकल चालवणार असल्याचे जाहीर केले आहे. या वातानुकूलित लोकल साध्या लोकांच्या जागी चालवण्यात येणार आहेत. यामुळे मध्य रेल्वेवर एकूण 66 एसी लोकल दररोज चालवल्या जाणार आहेत.
मात्र प्रवासी संघटना या निर्णयामुळे नाराज आहेत.
ठाणे आणि त्यापुढील डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर अशा भागात राहणाऱ्या प्रवाशांसाठी पाचवी आणि सहावी मार्गिका एक वरदान असेल असे भसवण्यात आले होते. मात्र जेव्हा पासून या दोन मार्गिककाचे लोकार्पण झाले आहे, तेव्हापासून फक्त एसी लोकलच चालवल्या गेल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही मर्गिकांचा प्रवाशांना तसा काहीच उपयोग झाला नाही.
साध्या लोकल बंद करून एसी लोकल सुरू करणे हे मध्य आणि पश्चिम रेल्वेसाठी अपरिहार्य आहे असे सांगितले जात आहे. कारण येणाऱ्या काळात जितक्या नवीन लोकल मुंबईकरांसाठी येतील त्या सर्व या एसी लोकल असणार आहेत, असा निर्णय आधीच घेण्यात आलेला आहे. मात्र हा निर्णय घेत असताना मुंबईतील सर्वसामान्य गरीब प्रवाशांचा विचार केला का असा प्रश्न निर्माण होतो. कारण या प्रवाशांसाठी एसी लोकलचे तिकीट किंवा पास काढणे म्हणजे महिन्याभराचे दोन वेळेचे जेवायचे पैसे खर्च करण्यासारखेच आहे.
एसी लोकलला सर्वच मार्गांवर प्रवाशांचा थंड प्रतिसाद होता. तिकिटांचे दर हे प्रवाशांना परवडणारे नव्हते पण केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबईचा दौरा करून लोकल आणि रेल्वेची पाहणी केली. यावेळी त्यांनी एसी लोकलच्या तिकिटाचे दर निम्मे कऱण्याची घोषणा केली होती. तिकिटाचे दर कमी झाल्यानंतर प्रवाशांचे दर कमी झाल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला. म्हणूनच प्रवाशांची वाढता प्रतिसाद पाहता फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क शिवाजी सुतार यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.