एक्स्प्लोर

नोकरी मागायला गेलेल्या तरुणीला बेदम मारहाण

मुंबई : नोकरीसाठी दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या एका तरुणीसोबत प्लेसमेंट एजन्सीमधील लोकांनी गैरवर्तन केलं. तसंच तिला आणि तिच्या आईला बेदम मारहाणही केली. या घटनेत जखमी झालेल्या मायलेकींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.   सायली धुर्वे असं या पीडित तरुणीचं नाव आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी एक्सपर्ट प्लेसमेंट एजन्सीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.   काय आहे प्रकरण? प्लेसमेंट एजन्सीचा मालक आणि कर्माचाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. मुलीचे वडील शिवाजी धुर्वे यांच्या माहितीनुसार, "सायलीने अंधेरीच्या एका प्लेसमेंट एजन्सी एक्सपर्ट मॅनेजमेंटमध्ये नोकरीसाठी अर्ज दिला आहे. एजन्सीने यासाठी तरुणीकडून 650 रुपये घेतले होते. पण आठ दिवसांनंतही सायलीला कोणत्याही कंपनीतून कॉल न आल्याने तिने प्लेसमेंट एजन्सीमध्ये फोन करुन विचारणा केली. यानंतर प्लेसमेंट एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी सायलीला ऑफिसमध्ये बोलावलं. तुला ट्रेनिंग द्यावी लागेल, असं सांगत एजन्सीने आणखी पैशांनी मागणी केली." MUMBAI-PLACEMENT-2 "परंतु सायलीने पैसे देण्यास नकार दिला आणि आधी भरलेले पैसे परत देण्याची मागणी केली. यानंतर सायली आणि प्लेसमेंट एजन्सीच्या कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. एजन्सीचा मालक आणि एका कर्मचाऱ्याने सायलीसोबत गैरवर्तन केलं. तसंच तिला आणि तिच्या आईला मारहाण केली. दोघींना धक्के मारुन ऑफिसबाहेर काढलं. यादरम्यान सायलीच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली. सायलीला उपचारांसाठी आधी नानावटी रुग्णालय आणि नंतर जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं."   घटनेचा पोलिस तपास सुरु   या घटनेनंतर डी एन नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी सायली आणि तिच्या आईचा जबाब नोंदवला. त्यानंतर एक्सपर्ट मॅनेजमेंट नावाच्या या प्लेसमेंट एजन्सीच्या मालक तसंच कर्मचाऱ्याविरोधात भारतीय दंडविधान कलम 354, 337, 341, 509, 323/34  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
प्रभू श्रीरामांचा बॅनर, भगवा झेंडा, गावागावात जाऊन सभा घेणार; राम मंदिर चोरीवरुन भास्कर जाधव आक्रमक
प्रभू श्रीरामांचा बॅनर, भगवा झेंडा, गावागावात जाऊन सभा घेणार; राम मंदिर चोरीवरुन भास्कर जाधव आक्रमक

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
Beed Crime : IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले
IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले
Embed widget