एक्स्प्लोर

परळ आग : क्रिस्टल टॉवरला ओसी नव्हती, स्थानिकांचा आरोप

परेल पूर्वमधील हिंदमाता परिसरातील 17 मजली क्रिस्टल टॉवरच्या बाराव्या मजल्यावर आज सकाळी साडेआठच्या सुमारास आग लागली होती.

मुंबई : परळच्या उच्चभ्रू परिसरातील 17 मजली क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीत चार नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक वृद्ध महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. दोन पुरुषांचा लिफ्टमध्ये अडकल्याने गुदमरुन मृत्यू झाला. तर एका वृद्ध महिला आणि पुरुष यांनी आगीत जीव गमावला. तसंच 16 जणांवर केईएममध्ये उपचार सुरु आहेत. क्रिस्टल टॉवरला मोठी आग परेल पूर्वमधील हिंदमाता परिसरातील 17 मजली क्रिस्टल टॉवरच्या बाराव्या मजल्यावर आज सकाळी साडेआठच्या सुमारास आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 20 गाड्या आणि सहा पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जवानांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. तसंच इमारतीमध्ये अडकलेल्या 25 जणांना हायड्रोलिक शिडी आणि क्रेनच्या साहाय्याने सुखरुप बाहेर काढलं. लिफ्टमध्ये गुदमरुन मृत्यू आग लागल्यानंतर लिफ्टचा वापर करु नये, असं अग्निशमन दलातर्फे वारंवार बजावलं जातं. मात्र या सूचनेकडे दुर्लक्ष करत दोघांनी लिफ्टमधून खाली येण्याचा प्रयत्न केला. आग लागल्यानंतर संजीव नायर आणि अशोक संपत हे नागरिकांना वाचवण्यासाठी गेले होते. काही लोकांना त्यांनी वाचवलंही. पण परत येताना त्यांनी लिफ्टचा वापर केला. परंतु त्यांचा लिफ्टमध्येच गुदमरुन करुण अंत झाला. तर बबलू शेख (वय 36 वर्ष) आणि शुभदा शेळके (वय 62 वर्ष) यांचाही श्वास गुदमरुन मृत्यू झाला. मुलीच्या प्रसंगावधानाने कुटुंबीयांची सुटका इमारतीला लागलेल्या आगीनंतर एका मुलीने प्रसंगावधान राखत आगीतून बाहेर पडण्याचं शास्त्रशुद्ध तंत्र दाखवलं आणि आपल्या कुटुंबीयांची सुटका केली. दहा वर्षांच्या झेन सदावर्तेने घरातील कपडे जमवून फाडले आणि ओले केले. ओले कपडे नाकाशी धरुन श्वासोच्छवास करण्याचा सल्ला तिने कुटुंबीय आणि शेजाऱ्यांना दिला. त्यामुळे आगीनंतर धुराचं साम्राज्य पसरलेलं असतानाही श्वास गुदमरत नाही. कपड्यात धुरातील कार्बन शोषला जाऊन ऑक्सिजनचा पुरवठा होत राहतो. शॉर्ट सर्किटमुळे आग दरम्यान, आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नसलं तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवलं असून कूलिंग ऑपरेशन सुरु असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. तसंच परिसरातही धूर कायम आहे. इमारतीला ओसी नव्हती : स्थानिकांचा आरोप आगीत इमारतीच्या वरच्या मजल्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र पाच वर्षापूर्वी बांधलेल्या या इमारतीला ओसी अर्थात भोगवटा प्रमाणपत्र मिळालं नव्हतं, तसंच बिल्डरने अग्निरोधक यंत्रणाही बसवलेली नाही, असा दावा याच इमारतीत राहणाऱ्या लोकांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
भाड्याने वाहन लावून देण्याचं आश्वासन, महिलेकडून तब्बल 33 लाखांची फसवणूक, दिंडोशी पोलिसांची मोठी कारवाई, आरोपीला मध्य प्रदेशातून अटक 
भाड्याने वाहन लावून देण्याचं आश्वासन, महिलेकडून तब्बल 33 लाखांची फसवणूक, दिंडोशी पोलिसांची मोठी कारवाई, आरोपीला मध्य प्रदेशातून अटक 

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget