मुंबई : मराठी (Marathi) असल्याने मुलुंडमध्ये (Mulund) तृप्ती देवरुखकर (Trupti Deorukhkar) या महिलेला ऑफिससाठी जागा नाकारण्यात आली. त्यांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी देखील त्यांना आलेला अनुभव सांगितला. तसंच तृप्ती देवरुखकर यांच्या पाठिशी असल्याचं सांगितलं. यानंतर तृप्ती देवरुखकर यांनी पंकजा मुंडे यांचे आभार मानले आहे. "आपण माझ्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहिलात, आपल्यामुळे माझ्यासारख्या मराठी महिलेला न्याय मिळाला," अशा शब्दांत तृप्ती देवरुखकर यांनी भावना व्यक्त केल्या. त्यावर 'यू आर व्हेरी गुड फायटिंग स्पिरिट' असं म्हणत पंकजा मुंडे यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं. 


तृप्ती देवरुखकर आणि पंकजा मुंडेंमध्ये काय संवाद झाला? 


पंकजा मुंडे यांना फोन करुन तृप्ती देवरुखकर म्हणाल्या की, "आपण माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलात, आपल्यामुळे माझ्यासारख्या मराठी महिलेला न्याय मिळाला. "यावेळी पंकजाताई त्यांना म्हणाल्या की, आपल्यावर आलेल्या प्रसंगाने मी खूप अस्वस्थ झाले होते, तुम्ही कोणाच्या विरोधात बोलत नव्हता, कोणत्या जातीच्या ,पक्षाच्या किंवा भाषेविरोधात बोलत नव्हता, तुम्ही तुमची बाजू खूप छान, मुद्देसूद मांडलीत, एक महिला म्हणून तुम्ही लढला, 'यू आर व्हेरी गुड फायटिंग स्पिरीट'..तुमच्या भूमिकेमुळे एका विषयाला न्याय मिळाला. मी पण एका महिलेला न्याय मिळावा यासाठीच भूमिका मांडली," अशा शब्दांत प्रोत्साहन दिले.


तृप्ती देवरुखकर या मुलुंड परिसरातील एका इमारतीत कार्यालयासाठी जागा पाहायला गेल्या होता. यावेळी महाराष्ट्रीयन, मराठी नागरिकांना इथे जागा मिळणार नाही, असं सोसायटीच्या सचिवाने सांगितलं. मुंबईतच मराठी माणसांवर होत असलेल्या अन्यायाबाबत तुप्ती देवरुखकर यांनी व्हिडीओ रेकॉर्ड करुन संताप व्यक्त केला. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन पितापुत्राला धडा शिकवत माफी मागायला सांगितली होती. 


'यू आर व्हेरी गुड फायटिंग स्पिरीट'


यानंतर पंकजा मुंडे यांनी देखीच अशाच आशयाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. यात त्यांनी त्यांच्यासोबत घटलेल्या घटनेचा उल्लेख केला होता. या संपूर्ण प्रकारानंतर तृप्ती देवरुखरकर यांनी शुक्रवारी (29 सप्टेंबर) पंकजा मुंडे यांना फोन करुन त्यांचे आभार मानले. आपण माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलात, आपल्यामुळे माझ्यासारख्या मराठी महिलेला न्याय मिळाला." त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, "आपल्यावर आलेल्या प्रसंगाने मी खूप अस्वस्थ झाले होते, तुम्ही कोणाच्या विरोधात बोलत नव्हता, कोणत्या जातीच्या, पक्षाच्या किंवा भाषेविरोधात बोलत नव्हता, तुम्ही तुमची बाजू खूप छान, मुद्देसूद मांडलीत, एक महिला म्हणून तुम्ही लढला, 'यू आर व्हेरी गुड फायटिंग स्पिरीट'..तुमच्या भूमिकेमुळे एका विषयाला न्याय मिळाला. मी पण एका महिलेला न्याय मिळावा यासाठीच भूमिका मांडली, अशा शब्दांत प्रोत्साहन दिले.