एक्स्प्लोर

MPSC : परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न

MPSC State Excise Exam Leak Allegations : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाल्याने प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्या उमेदवारांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेली राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक (गट-क) पदाची विभागीय परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या परीक्षेचे मार्किंग पॅटर्न फुटला होता आणि त्याचा फायदा काही उमेदवारांना झाल्याचा आरोप या आधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केला होता. आताही एमपीएससीच्या एका निवेदनावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. मार्किंग पॅटर्न देण्याची जबाबदारी ही आयोगाची होती. मार्किंग पॅटर्न लीक झाला तर आयोगाने पेपर का घेतला? असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला. 

राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक (गट-क) पदासाठी (State Excise Sub Inspector Exam) मर्यादित विभागीय परीक्षा 23 सप्टेंबर 2025 रोजी घेण्यात आली होती. त्या परीक्षेचा मार्किंग पॅटर्न फुटल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. या प्रकरणाचा तपास नवी मुंबई पोलिसांनी केला होता. त्या संबंधी गोपनीय अहवाल त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला दिला. मात्र, आयोगाने तो अहवाल अद्याप जाहीर केला नाही.

Rohit Pawar On MPSC : रोहित पवारांचा आरोप

या गोपनीय अहवालासंबंधी नागपूर पोलिसांचे एक पत्र समोर आलं. त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव आणि इतर अधिकारी दोषी असल्याचं सांगितलं होतं. या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारसही त्यामध्ये करण्यात आली आहे. यासंबंधी 27 ऑगस्ट रोजी एबीपी माझाने बातमी प्रकाशित केली होती. 

मात्र, या अहवालातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहसचिवाचा उल्लेख अनावधानाने झाला असल्याचं स्पष्टीकरण आयोगाने दिलं आहे. त्या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त आणि इतर अधिकारी असा उल्लेख असल्याचं आयोगाने त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे. 

या निवेदनावरून आता रोहित पवारांनी पुन्हा एकदा आयोगाला धारेवर धरलं आहे. आयोगाचा हा खुलासा हास्यास्पद आहे. मुळात सहसचिव कोणत्या विभागाचा होता हा प्रश्न नाही, तर मार्किग पॅटर्न लीक केल्याचा आहे. शेवटी मार्किंग पॅटर्न देण्याची जबाबदारी ही आयोगाचीच होती, याचा विसर आयोगाला पडला का? मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? याचे उत्तर आयोगाने द्यावे, असं रोहित पवारांनी त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

ही बातमी वाचा:

एबीपी माझामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत, सध्या असोसिएट प्रोड्युसर. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Same Language Subtitling : आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ
आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ
Advertisement

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
Rajnath Singh: ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
Thane Crime Pradeep Purnekar: टल्ली आणि पपलूला खोदून खोदून विचारलं, पण 'त्या' गोष्टीबद्दल काहीच सांगेनात, पोलीस नेमकं काय म्हणाले?
टल्ली आणि पपलूला खोदून खोदून विचारलं, पण 'त्या' गोष्टीबद्दल काहीच सांगेनात, पोलीस नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Embed widget