एक्स्प्लोर

'काळजी घ्या दिलीप सर', लाडक्या मोटरमनला निरोप देताना मुंबईकरांचे डोळे पाणावले

फुलांनी सजविलेली लोकल ट्रेन, त्यात काळा कोट आणि डोक्याला रुमाल बांधून त्याच उत्साहात लोकलट्रेन चालवणारे दिलीप सिंग आज सीएसएमटी स्थानकावर पोहोचले आणि लोकलमधून उतरलेल्या प्रवाशांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेत त्यांना हारतुरे घातले तर अनेकांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

मुंबई : दररोज सीएसएमटीच्या दिशेने हजारो प्रवाशांना सुखरूप घेऊन येणाऱ्या आणि संध्याकाळी पुन्हा आपल्या राहत्या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या लोकल ट्रेनचे मोटरमन दिलीप सिंग यांच्या नोकरीचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे ऑफिसला वेळ होत असतानाही अनेक मुंबईकर त्यांच्याजवळ थांबून, त्यांना मिठी मारून, त्यांना शुभेच्छा देत त्यांचा निरोप घेत होते. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरील वातावरण आज भाऊक झालं होतं. फुलांनी सजविलेली लोकल ट्रेन, त्यात काळा कोट आणि डोक्याला रुमाल बांधून त्याच उत्साहात लोकलट्रेन चालवणारे दिलीप सिंग आज सीएसएमटी स्थानकावर पोहोचले आणि लोकलमधून उतरलेल्या प्रवाशांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेत त्यांना हारतुरे घातले तर अनेकांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. आज दिलीप सिंग यांच्या नोकरीचा शेवटचा दिवस होता. दिलीप सिंग हे 27 वर्षांपूर्वी आग्रा इथल्या बरहान गावातून नोकरीसाठी मुंबईत आले. त्यावेळी त्यांचे शिक्षण बीएससीपर्यंत झालं आहे. 26 वर्ष ते मुंबईत रेल्वे प्रशासनामध्ये आपली सेवा बजावत आहेत. मोटरमन म्हणून त्यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर लाखो प्रवासी त्यांच्या वेगळ्या लूक आणि स्वभावामुळे त्यांच्याशी जोडले गेले. नेहमी हसतमुख आणि येणाऱ्या-जाणाऱ्या हसर्‍या चेहर्‍याकडे बघून हात करणारे दिलीप सिंग हे आज आपल्या ट्रेनचे मोटरमन आहेत समजल्यानंतर अनेक प्रवाशांना बरं वाटायचं. सीएसएमटीला उतरल्यानंतर अनेक वर्ष हे प्रवासी दिलीप सिंग यांच्या हातात हात देऊन पुढे आपल्या कामाला निघून जायचे. नेहमी हसतमुख असणाऱ्या दिलीप सिंग यांनी प्रवाशांच्या मनावर आपली एक वेगळी छाप उमटवली होती. नोकरी करता करता 26 वर्ष कधी उलटली हे त्यांनाही कळलं नाही. काही कारणांमुळे त्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली. आज त्यांच्या नोकरीचा शेवटचा दिवस होता. सकाळी अकरा वाजता ठाण्याहून निघालेल्या आणि सीएसएमटीच्या दिशेने धावणाऱ्या लोकल ट्रेनला फुलांनी सजवलं होतं. काळा कोट, डोक्याला रुमाल बांधून त्याच उत्साहाने मोटरमन दिलीप सिंग हे लोकल ट्रेन चालवत होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये लोकल ट्रेन दाखल होताच फुलांनी सजविलेल्या लोकलकडे सार्‍यांचे लक्ष गेलं. लोकल ट्रेनचा हॉर्न वाजू लागला. लोकल ट्रेन थांब्यावर थांबताच अनेक प्रवासी धावत मोटरमन केबिन जवळ आले. दिलीप सिंग यांचे सहकारी, प्रवासी यांनी दिलीप सिंग यांना पुष्पगुच्छ, हारतुरे घालून हस्तांदोलन करून त्यांना आज निरोप दिला. यावेळी अनेक प्रवाशांना मोटरमन दिलीप सिंग यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. हा संपूर्ण प्रकार सीएसएमटीवर असणारे अनेक प्रवासी कुतुहलाने पाहात होते. आणि तेही ही याची माहिती घेण्याचा प्रयत्न करत होते. अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या करतात. मात्र ते कधी आले, कधी गेले आणि कधी रिटायर झाले याचा पत्ताही नसतो. मात्र दिलीप सिंग यांच्यासारख्या या दिलखुलास, मितभाषी व्यक्तिमत्वाला निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते.' काळजी घ्या दिलीप सर' असं अनेकजजणांनी सांगत त्यांनी दिलीप सिंग यांना निरोप दिला.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Police Threats Students : खिशात अमली पदार्थ ठेवून आत टाकण्याची भाषा; त्याच पोलिसाला गृहखात्याचा मोठा दणका, विद्यार्थ्याला धमकी देणाऱ्या पोलिसाची बदली
खिशात अमली पदार्थ ठेवून आत टाकण्याची भाषा; त्याच पोलिसाला गृहखात्याचा मोठा दणका, विद्यार्थ्याला धमकी देणाऱ्या पोलिसाची बदली
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
Police Threats Students :
"पुन्हा दिसलात तर 50 ग्रॅम ड्रग्स टाकून आत टाकू!"; नीट पेपर फुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच चौकशीचे आदेश

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Police Threats Students :
"पुन्हा दिसलात तर 50 ग्रॅम ड्रग्स टाकून आत टाकू!"; नीट पेपर फुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच चौकशीचे आदेश
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
Pune FDA Action: अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
Jantar Mantar Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Gold Silver Price Today: तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
Rahul Gandhi on PM Modi:
"तुम्हीच आपल्या देशातील तरुणांच्या भविष्याशी सर्वाधिक खेळलाय, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, विद्यार्थ्यांची माफी मागा" राहुल गांधींचा मोदींवर कडाडून हल्लाबोल
Tukaram Munde FDA Action On BMC Canteen Mumbai: मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
Embed widget