मुंबई :  जी.टी. रुग्णालयात (G. T. Hospital) महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या रकमेवर चोरट्यांचा डल्ला मारला आहे. 9 लाख 87  हजारहून अधिक रक्कमेवर चोरट्यांनी  डल्ला मारला आहे.  10  बनावट चेकच्या माध्यमातून वैद्यकीय अधिक्षकांच्या खोट्या सहीवरुन पैसे वळवले.  डिसेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024  दरम्यान रक्कम काढल्याचं समोर आले आहे.  आझाद मैदान पोलीस ठाण्यात 7  जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.


समोर आलेल्या माहितीनुसार, जी टी रुग्णालयात गरीबांसाठी चालवल्या जाणाऱ्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या  रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला. बनावट चेकच्या माध्यमातून रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक यांच्या खोट्या स्वाक्षरीकरून हे पैसे सात जणांच्या खात्यावर वळवण्यात आल्याचे प्रथमदर्शी समोर आले आहे. डिसेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 दरम्यान ही रक्कम काढण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. एकाच नंबरचे चेक दोन वेगवेगळ्या खात्यावर वटवण्यात आल्याने ही बाब आली समोर आली आहे. 


मरीनड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


मुंबईच्या आझाद मैदान पोलिस ठाण्यात 7 आरोपींच्या विरोधात कलम 420, 465,467,468,471,474,  120 (ब), 34  भारतीय दंड सहिता 1860 कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. फसवणूक करण्यात आलेली रक्कम उत्तर प्रदेशमधील निहाल,विनोद यादव, अंजुम तारा, वरून यादव, शशांक कुमार, रोहित राज यांच्यासह अन्य आरोपींच्या खात्यावर जमा झाल्याचे समोर आले आहे.  या आधी राज्याच्या पर्यटन संचालनालय विभागाच्या खात्यातून 68 लाख व शालेय क्रिडा विभागाच्या खात्यातून 47 लाख अशाच प्रकारे काढण्यात आले होते.त्या प्रकरणी मरीनड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


पैशांवर डल्ला मारल्याने अनेकाच्या भूवया उंचावल्या


दरम्यान सायबर चोरट्यांनी आता तिसऱ्यांदा जी टी  रुग्णालयातील गरीबांसाठी चालवल्या जाणाऱ्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या पैशांवर डल्ला मारल्याने अनेकाच्या भूवया उंचावल्या आहेत. या प्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


राज्याचा कारभार हाकणारी यंत्रणा सुरक्षीत नाही


 ही घटना घडल्याने संपूर्ण राज्याचा कारभार हाकणारी यंत्रणा सुरक्षित नसल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.   चोरीची बाब निदर्शनास ही येताच त्याने  चोरीची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांकडे गुन्हाही दाखल केला.


हे ही वाचा 


छत्रपती शिवाजी महाराज अन् सावरकरांची तुलना कदापि होऊ शकत नाही; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार