मुंबई : आज राज्यात कोरोनाबाधीत 440 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या 8068 झाली आहे. यातील सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरात आहेत. मुंबईत कोरोना संक्रमितांची संख्या पाच हजाराहून जास्त आहे. अचूक सांगायचं म्हणजे आताच्या घडीला मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 5407 लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तर, 204 रुग्णांचा यात बळी गेला आहे. चिंताजनक म्हणजे मुंबईतल्या 6 वॉर्डमध्ये 300 पेक्षा जास्त रुग्ण आहेत. चार वार्डमध्ये 200 हून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 100 रुग्ण असलेले सात वार्ड आहेत. हे सर्व वार्ड पूर्णपणे सील करण्यात आले आहे.

मुंबईत दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. कारण, मुंबईतल्या 6 वॉर्डमध्ये 300 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद आहे. 4 वॉर्डमध्ये 200 हून अधिक रुग्ण तर, 100 रुग्ण असलेले 7 वॉर्ड आहेत. त्यामुळे 100 पेक्षा जास्त रुग्णसंख्या असलेल्या मुंबईतील हॉटस्पॉटमध्ये आणखी दोन वॉर्डची भर पडली आहे. पालिका क्षेत्रात 100 पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या एकूण वॉर्डची संख्या 15 झाली आहे. (काल 13 होती) तर, मुंबईतील 8 वॉर्डमध्ये 200 पेक्षा जास्त पॉझिटीव्ह रुग्ण आहेत.

  • जी साऊथ- वरळी, प्रभादेवी, लोअर परळचा परिसर - 600 रुग्ण - 125 रुग्ण बरे झाले.

  • ई वॉर्ड- भायखळा , भायखळा फायर ब्रिगेडच्या आसपासचा भाग - 466 रुग्ण - 53 रुग्ण बरे झाले.

  • के वेस्ट - अंधेरी पश्चिमचा भाग - 373 रुग्ण, 64 बरे झाले.

  • एल वॉर्ड - कुर्ला परिसराचा समावेश - 371 रुग्ण, 32 रुग्ण बरे झाले.

  • एफ नॉर्थ - सायन, माटुंगा, वडाळा 359 रुग्ण, 27 रुग्ण बरे झाले.

  • जी नॉर्थ - दादर, माहिम, धारावी - 349 रुग्ण, 29 रुग्ण बरे झाले.

  • डी वॉर्ड - नाना चौक ते मलबार हिल परिसर - 285 रुग्ण, 40 रुग्ण बरे झाले.

  • के ईस्ट - अंधेरी पूर्वचा समावेश, जोगेश्वरी - 265 रुग्ण, 56 बरे झाले.

  • एच इस्ट - वांद्रे पूर्वचा भाग, वाकोला परिसर, कलानगर ते सांताक्रुझ

  • (मातोश्री) - 263 रुग्ण, 32 रुग्ण बरे झाले.

  • एम ईस्ट - गोवंडी, मानखुर्दचा समावेश - 210 रुग्ण, 25 रुग्ण बरे झाले.

  • एम वेस्ट - चेंबुरचा समावेश - 160 रुग्ण, 24 बरे झाले.

  • एफ साऊथ - परळ, शिवडीचा समावेश - 154 रुग्ण, 14 बरे झाले.

  • S वॉर्ड - भांडुप, विक्रोळीचा परिसर 131 रुग्ण, 24 बरे झाले.

  • ए वॉर्ड - कुलाबा, कफपरेड, फोर्टचा परिसर - 127 रुग्ण, 10 बरे झाले.

  • पि नॉर्थ मालाड, मालवणी, दिंडोशी परिसराचा समावेश 120 रुग्ण, 26 बरे झाले.

  • एच वेस्ट - बांद्रा, खार, पश्चिमेचा भाग - 115 रुग्ण, 19 बरे झाले.

  • एन - घाटकोपरचा भाग - 109 रुग्ण, 21 बरे झाले.


Coronavirus | मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात प्लाज्मा थेरपी सुरु