मुंबई : मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारवीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नवी योजना तयार करण्यात आली आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने आणि खासगी डॉक्टरांच्या साहाय्याने, धारावीतील 350 खासगी दवाखाने सोमवारपासून (27 एप्रिल) सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या दवाखान्यांमध्ये नॉन कोविड उपचारांसोबतच, कोरोना संशयितांचीही प्राथमिक चाचणी करण्यात येणार आहे.


धारावीतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत, धारावीतील खासगी दवाखाने सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाला 'इंडियन मेडिकल काऊन्सिल' आणि 'माहिम-धारावी मेडिकल प्रॅक्टिक्शनर असोसिएशन' यांच्या पदाधिकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. खासगी दवाखान्यात आलेल्या नॉन-कोविड नागरिकांवर उपचार केले जातील.


...तर, केंद्रातील अर्थव्यवस्थेला राज्ये योगदान देऊ शकणार नाहीत; शरद पवार यांचे पंतप्रधानांना पत्र


तसेच, संशयित रुग्णांना कोरोनाची लक्षणे, कोरोनाची विनामुल्य चाचणी, त्यावरील विनामुल्य उपचार, कोरोनाबाधितांच्या कुटुंबियांना महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या मोफत सुविधा याबाबतची माहितीही खासगी डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णांना दिली जाणार आहे. संशयित रुग्णांचा तपशील महापालिका प्रशासनाला कळवून पुढील कारवाई केली जाणार आहे. या खासगी डॉक्टरांना पीपीई किट, सॅनिटायझर आणि दवाखान्याचे सॅनिटायझेशन या सुविधा महानगरपालिकेकडून पुरवण्यात येणार आहेत. याआधीच धारावीतील सुमारे 50 हजार नागरिकांची घरोघरी जाऊन स्क्रीनिंग केल्याबद्दल मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्या हस्ते या डॉक्टरांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले आहे.


Coronavirus | राज्यात आज 811 नवे कोरोनाबाधित; कोरोनाबाधितांचा आकडा 7628



धारावीतील खासगी दवाखाने सुरू झाल्यामुळे नजिकच्या लोकमान्य टिळक रुग्णालयावरील ताण काही प्रमाणात कमी होईल. तसेच, खासगी डॉक्टर नागरिकांच्या परिचयातील असल्याने, कोणतीही माहिती रुग्णांकडून लपवली जाणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांची स्क्रीनिंग करणे प्रशासनाला शक्य होईल, असं खासदार राहुल शेवळे यांनी म्हटलं.

Corona Ground Report | कोरोनाचा ग्रामीण भागातील ग्राऊंड रिपोर्ट! पाहा तुमच्या जिल्ह्यातील कोरोना अपडेट