मुंबई : कोरोना संक्रमित रुग्णांवर उचपार करण्यासाठी आता समर्पित रुग्णालये आहेत. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अनेक रुग्णालये आता भरली आहेत. परिणामी कुठल्या रुग्णालयात जागा आहे, हे समजणे अवघड होत आहे. मात्र, ही अडचण आता दूर झाली आहे. कोणत्या रुग्णालयात जागा शिल्लक आहे, हे एका फोन कॉलवर समजणार आहे. मुंबई महापालिकेने त्यासाठी एक हेल्पलाईननंबर जारी केला आहे. कोरोना पेशंटसाठी नजीकच्या कोणत्या रुग्णालयात जागा होऊ शकेल हे जलदगतीनं समजण्यासाठी हेल्पलाईनवर आता खास सोय करण्यात आली आहे.
महापालिकेच्या '1916' या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून '3' नंबर निवडल्यास 'कोविड' रुग्णांसाठी खाटा उपलब्ध असलेल्या रुग्णालयांची माहिती तात्काळ मिळणार आहे. 1916 क्रमांकावर संपर्क साधून '1' नंबर निवडल्यास 'कोविड' विषयी डॉक्टरांचे टेलिफोनिक मार्गदर्शन मिळणार आहे. तर रुग्णवाहिकेसाठी '2' नंबर निवडणे गरजेचे आहे.


..तर, केंद्रातील अर्थव्यवस्थेला राज्ये योगदान देऊ शकणार नाहीत; शरद पवार यांचे पंतप्रधानांना पत्र

'कोरोना कोविड' विषयक हेल्पलाईन
महापालिकेशी संबंधित इतर नागरी सेवा सुविधा विषयक बाबींसाठी महापालिकेच्या 'वन नाईन वन सिक्स' या 'हेल्पलाइन' क्रमांकावर संपर्क साधून '4' हा क्रमांक निवडणे आवश्यक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या '1916' (वन नाईन वन सिक्स) या हेल्पलाइन क्रमांकावरच आता 'कोरोना कोविड' विषयक हेल्पलाईन देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. विविध रुग्णालयांमध्ये 'कोविड' बाधित रुग्णांसाठी असलेल्या खाटांपैकी उपलब्ध असलेल्या खाटांची माहिती सध्या नियमितपणे अद्ययावत केली जात आहे. तसंच, लवकरच ही माहिती 'रियल टाईम' पद्धतीने देखील अद्ययावत करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढला
कोरोना व्हायरसने संक्रमित लोकांचा आकडा आजही चढताच आहे. दिलासादायक म्हणजे ही वाढ कालच्या तुलनेत निम्म्याने कमी झाली आहे. आज राज्यात कोरोनाबाधीत 440 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या 8068 झाली आहे. आज 112 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 1188 रुग्ण बरे झाले आहेत. तर दिवसभरात 19 लोकांचा कोरोनामुळे बळी गेलाय, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

Wadala Lockdown Help | वडाळ्याच्या डॅफोडील सोसायटीत सर्व रहिवाशांसाठी घरपोच सेवा, एकटे राहणाऱ्या जेष्ठांना जेवणाचीही सोय