एक्स्प्लोर

Vashi APMC मुळे 200 हून अधिकांना कोरोना संसर्ग, आजपासून एक आठवडा एपीएमसी बंद

Vashi APMCमधील रूग्ण वाढीमुळे नवी मुंबईकरांनी रोष व्यक्त करत त्वरीत बंद करण्याची मागणी केली होती. यावर आता सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत पुढील एक आठवडा एपीएमसी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबई : नवी मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या आता 674 झाली आहे. गेल्या आठवड्यापासून कोरोना संसर्गाचा वेग हा कमालीचा वाढलेला दिसून येत आहे. सध्या वाढत असलेली कोरोना पॉझिटिव्ह संख्या ही एपीएमसीतील व्यापारी, माथाडी कामगारांमुळे वाढत असल्याने महानगरपालिका प्रशासनाची चिंता चांगलीच वाढली आहे. वाशी एपीएमसीमुळे 220 ते 230 कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची भर पडली आहे. एपीएमसीमधील रूग्ण वाढीमुळे नवी मुंबईकरांनी रोष व्यक्त होत त्वरीत बंद करण्याची मागणी केली होती. यावर आता सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत पुढील एक आठवडा एपीएमसी मधील भाजीपाला, कांदा, बटाटा, फळं, मसाला, दाना मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एक आठवडा मार्केट बंद केल्यानंतर या दरम्यान कामगार, व्यापारी, ट्रान्सपोर्टर अशी 18 ते 20 हजार जणांची स्किनिंग करण्यात येणार आहे. यात ज्यांना लक्षणे आढळतील त्यांना मार्केटमध्ये प्रवेश बंदी केली जावून त्यांचे कोरोना टेस्ट केल्या जाणार आहेत. जीवनावश्यक गोष्टींची कमतरता मुंबईला पडू नये यासाठी वाशी येथील एपीएमसी मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय व्यापारी आणि माथाडी कामगारांनी घेतला होता. मात्र परिसरात कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने कम्युनिटी संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरू नये यासाठी एपीएमसी मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजी , फळ, कांदा बटाटा, मसाला, दाना मार्केट 11 ते 17 मे पर्यंत बंद करण्याचे आदेश एपीएमसी प्रशासनाने दिले आहेत. मार्केट बंद राहिल्यानं मुंबईत येणाऱ्या मालावर परिणाम होण्याची शक्यता आहे. 11 ते 17 मे या कालावधीत माथाडी कामगार, व्यापाऱ्यांचं स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. कोकण आयुक्त, नवी मुंबई मनपा आयुक्त, पोलिस, माथाडी कामगार, व्यापाऱ्यांची 8 मे रोजी बैठक झाली होती, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. एपीएमसीमुळे 220 ते 230 कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची भर पडली आहे.  एपीएमसी मधील रुग्ण वाढीमुळे नवी मुंबईकरांची चिंता वाढली असून यासाठी सर्व स्तरातून रोष व्यक्त होत आहे. भाजप आमदार गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांना पत्रव्यवहार करून एपीएमसीमुळे कम्युनिटी संसर्ग पसरण्याची भिती असल्याने त्वरीत बंद करण्याची मागणी केली होती. एक आठवडा मार्केट बंद केल्यानंतर या दरम्यान कामगार , व्यापारी, ट्रान्सपोर्टर अशा 18 ते 20 हजार जणांचं स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. यात ज्यांना लक्षणे आढळतील त्यांना मार्केट मध्ये प्रवेश बंदी केली जाणार असून त्यांच्या कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor and Sunil Tatkare: प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत थेट नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...
प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...
Gunaratna Sadavarte and Manoj Jarange Patil: 'ठाणे का रिक्षा' म्हटल्यावर एकनाथ शिंदेंच्या आग लागते मग बावनकुळेंविषयी जरागेंनी वापरलेली अपमानस्पद भाषा पटते का? गुणरत्न सदावर्ते कडाडले
'ठाणे का रिक्षा' म्हटल्यावर एकनाथ शिंदेंच्या आग लागते मग बावनकुळेंविषयी जरागेंनी वापरलेली अपमानस्पद भाषा पटते का? गुणरत्न सदावर्ते कडाडले
Eknath Shinde OBC : जरांगे पाटलांची काल सडकून टीका, आज एकनाथ शिंदेंनी मर्जीतील नेत्याला ओबीसी महाअधिवेशनात धाडलं, मुख्यमंत्र्यांकडूनही 'खास' संदेश!
जरांगे पाटलांची काल सडकून टीका, आज एकनाथ शिंदेंनी मर्जीतील नेत्याला ओबीसी महाअधिवेशनात धाडलं, मुख्यमंत्र्यांकडूनही 'खास' संदेश!
Ramesh Mhatre: डॉक्टरांना मारहाण प्रकरण! नगरसेवक रमेश म्हात्रेला अखेर उच्च न्यायालयाचा दिलासा; कठोर अटी अन् शर्तीसह चारही आरोपींना जामीन मंजूर, कोर्टात नेमकं काय घडलं?
डॉक्टरांना मारहाण प्रकरण! नगरसेवक रमेश म्हात्रेला अखेर उच्च न्यायालयाचा दिलासा; कठोर अटी अन् शर्तीसह चारही आरोपींना जामीन मंजूर, कोर्टात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Embed widget