एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोरबे धरण भरल्यानं नवी मुंबईचा पाणी प्रश्न सुटला
नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारं मोरबे धरण पूर्ण भरलं आहे. यामुळे आता वर्षभरासाठी नवी मुंबईकरांचा पाणी प्रश्न सुटला आहे.
नवी मुंबई : नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारं मोरबे धरण पूर्ण भरलं आहे. यामुळे आता वर्षभरासाठी नवी मुंबईकरांचा पाणी प्रश्न सुटला आहे.
दररोज ४५० एमएलडी पाणी पुरवठा करण्याची क्षमता असणाऱ्या या धरणातून नवी मुंबईला दररोज २५० एमएलडी इतका पाणीपुरवठा केला जातो. ८८ मीटर इतकी या मोरबे धरणाची खोली असून मुसळधार पावसामुळे हे धरण आता काटोकाट भरलं आहे.
नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे यांनी धरणाची पाहणी करून जलपूजन केलं. त्यांच्याच हस्ते धरणाचे दरवाजे उघडून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने धरण पूर्ण भरलं आहे. यामुळे आता नवी मुंबईकरांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न सुटला असल्याचं महापौरांनी सांगितलं.
आता लवकरच पाईपलाईनचं काम करून २४ तास पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement