मुंबई : कोरोनाबरोबरच अनेक अशा गोष्टी या वर्षामध्ये घडल्या ज्यामुळे अगदी चक्रावून जाण्याची वेळ आली. अशाच गोष्टींपैकी एक होती जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये दिसून आलेले मोनोलिथ. डिसेंबरच्या अखेरीस हे मोनोलिथ भारतात अहमदाबाद येथे हे प्रथम आढळून आले. त्यानंतर आता मुंबईच्या वांद्रे परिसरातील जॉगर्स पार्क येथे  मोनोलिथ आढळून आलं आहे. वांद्रे येथील नगरसेवक आसिफ झाकरिया यांनी यासंदर्भात ट्वीट करत माहिती दिली आहे. तसेच त्यांनी पुढे मोनोलिथचा अर्थ काय असेल हे शोधून काढले पाहिजे असेही म्हटलं आहे. 


काय आहे मोनोलिथ? 


मोनोलिथ म्हणजे अखंड दगडी किंवा एखाद्या धातूची वस्तू. मोनोलिथचा वापर प्राचीन काळी मोठ्या वस्तू निर्मितीसाठी केला जात असे. मात्र, काळानुरुप तंत्रज्ञान विकसित होत गेलं आणि हे मोनोलिथ मागे पडत गेले. मागील काही वर्षांपासून पुन्हा मोनोलिथ आढळायला सुरुवात झाली आहे.



मोनोलिथचा वापर हा पर्यटनाला चालना देण्यासाठी किंवा विशिष्ट व्यवसायिक हेतूसाठी करण्यात येतो. मात्र, असं जरी  असले तरी यासंदर्भात उलटसुलट चर्चा ऐकायला मिळतात. एलियन्सकडून विशिष्ट संदेश देण्यासाठी किंवा जगावर संकट कोसळेल अशा चर्चा  होतात. मात्र, हे मोनोलिथ विशिष्ट हेतुनेच ठेवली जात असतात हेही आढळून आलं आहे. या मोनोलिथवर भारतातील नॅशनल रिझर्व्ह पार्कचे लॅटिट्यूट आणि लॉन्जिट्यूड  दिले आहेत. त्यामुळे याचा वापर नेमका कशासाठी केला आहे? हे रहस्यचं आहे. मोनोलिथ संदर्भात उत्सुकता वाढण्याचं कारण म्हणजे 2001 : 'अ स्पेस ओडेसी' हा सिनेमा. या सिनेमात मोनोलिथच्या माध्यमातून पृथ्वीवरील माकडांच्या एका विशिष्ट जातीला संदेश देण्याची कल्पना मांडली आहे. मात्र या सर्व विज्ञानकथा आहेत. 


 विज्ञान पत्रकार मयुरेश  प्रभुणे म्हणाले, दगडी शिळांसाठी मोनोलिथ हा शब्द वापरण्यात येतो. 2020 मध्ये  जगात अनेक ठिकाणी धातूचे मोनोलिथ आढळून आले आहे. आदिमानवापासून मानव कसा प्रगत होत चालला आहे. जगभरातील देशांनी मोनोलिथ रचल्याचा शास्त्रज्ञांचा कयास आहे. सर्वात प्रथम मोनोलिथ अमेरिकेच्या वाळवंटात सापडला होता. त्यानंतर अनेकांनी या बातम्या पाहून मोनोलिथची निर्मिती केली आणि रचले गले. भारतमध्ये अहमदाबादनंतर आता मुंबईत मोनोलिथ सापडला आहे. त्याचा स्त्रोत अद्याप माहित नाही. त्यामागे कुठेतरी '2001 : अ स्पेस ओडेसी' या चित्रपटामध्ये उगम सापडतो. यातून सध्या वेगळ्या प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु काळ्या रंगाच्या मोनोलिथपासून सुरू झालेला प्रवास आता धातूच्या मोनोलिथ पर्यंत येऊन पोहोचला आहे. 


BLOG | रहस्यमयी मोनोलिथ, चर्चेचा विषय!