मुंबई : एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा 14 मार्च रोजी होणार होती. ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पुढे ढकलल्यामुळे परीक्षार्थ्यांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. या संदर्भात आता नवीन माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तारीख पुढे जाण्याचे कारण कोरोना रुग्ण नसून परीक्षा घेण्यासाठी जी तयारी करावी लागते ती MPSC ने वेळेत केली नसल्याचं पुढे आले आहे.


14 तारखेला परीक्षा असताना तीन दिवस आधी एमपीएससीने सरकारला परिक्षेबाबत कळविले. मात्र, सरकारची सर्व यंत्रणा सध्या कोविड लसीकरण आणि वाढती रुग्णसंख्या व्यवस्थापन ह्यात व्यस्त आहे. परिक्षेबाबत एमपीएससीने सरकारबरोबर वेळीच समन्वय साधला नसल्याने नियोजन होऊ शकले नाही. परिणामी एमपीएससीने कोविड संकटाचे कारण पुढे करत परीक्षा रद्द करायचे पत्रक काढले आहे. हे पत्रक समोर आल्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांनी एमपीएससीच्या या निर्णय आणि एकूणच कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एमपीएससीच्या कारभारामुळे सरकार अडचणीत येत असल्याची मंत्र्यांची तक्रार आहे.


सरकारच्या निर्णयानुसार परीक्षा पुढे ढकलल्या : एमपीएससी
आयोगाचा निर्णय एकटा सचिव किंवा सहसचिव घेत नाहीत. शासनाने आम्हाला (MPSC) काल एक लेखी पत्र पाठवलं त्यावर आम्ही शासनाने पाठवलेल्या लेखी पत्राची अंमलबजावणी करत हे आजचं परिपत्रक काढलं आहे. हा निर्णय आपत्ती निवारण विभागाने दिला असून याला मुख्यमंत्री यांनी परवानगी दिली आहे. त्यानंतर हा निर्णय लेखी पत्राद्वारे घेण्यात आला असल्याचे आयोगाने सांगितले आहे.


मला अंधारात ठेऊन निर्णय : वडेट्टीवार 
आधीचे ट्वीट डिलीट केल्यानंतर वडेट्टीवार पुन्हा एकदा ट्विट डिलीट करत "माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून परस्पर घेतलेला निर्णय आहे. मला याबाबत काहीही माहिती नाही. मला अंधारात ठेऊन घेतलेला निर्णय असल्याने याबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI