मुंबईः लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाची तक्रार आता राज्यपाल, मुख्यमंत्री, ईडी आणि धर्मादाय आयुक्तांपर्यंत पोहचली आहे. मंडळातील माजी कार्यकर्ता महेश वेंगुर्लेकर यांनी ही आर्थिक घोटाळ्याची तक्रार केली आहे.


 

वेंगुर्लेकर यांच्या तक्रारीनंतर राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी तक्रारीची दखल घेण्यासाठी न्याय विभागाच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. धर्मादाय आयुक्तांनीही याबाबत अधिक माहिती मागवली आहे.

 

धर्मादाय आयुक्तांकडून मंडळाला वाचवण्याचा प्रयत्न?

लालबागच्या राजाच्या चरणी भाविक भक्तिभावाने दान करतात. मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. पण धर्मादाय आयुक्तांनी कसल्याही प्रकारची तक्रार अद्याप आली नसल्याचं म्हटलं आहे.

 

मात्र तक्रार केल्याची कॉपी, त्याला धर्मादाय आयुक्तांचं उत्तर आणि एफिडेव्हिट हे तिन्ही 'माझा'च्या हाती लागलं आहे. त्यामुळे धर्मादाय आयुक्त लालबागचा राजा मंडळाला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न करत आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे.