मुंबई: पोलिसांवर हात उगारल्यास कडक कारवाई करु असा इशारा, राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी दिला.

पोलिसांवरील वाढणाऱ्या हल्ल्यांबाबत सतीश माथूर यांनी चिंता व्यक्त केली. कारण नसताना नागरिकांनी पोलिसांशी आणि पोलिसांनी नागरिकांशी हुज्जत घालू नये, असं माथूर यांनी म्हटलं आहे.

कल्याणमध्ये काल पोलीस निरिक्षकाला बुडवून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर माथूर यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पोलिसांनवरील हल्ला म्हणजे सामान्य माणसावरील हल्ला आहे. नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये, पोलिसांच्या कारवाईबाबत काही आक्षेप असतील तर वरिष्ठांशी संपर्क साधावा, असं आवाहनंही माथूर यांनी केलं.

"एक ट्रॅफिक शिपाई लाखो गाड्यांचं ट्रॅफिक नियंत्रित करतो. त्यामुळे लोकांनी पोलिसांना समजून घ्यावं कारण नसताना लोकांनी कायदा हातात घेऊ नये. पोलिसांना सहकार्य करावे. आता आमचे पोलिस वेगवेगळ्या धार्मिक संघटना आणि वेगवेगळ्या गटांसोबत शांततेसाठी चर्चा करताहेत.नागरिकांनी सहकार्य करणं अपेक्षित आहे. मात्र अशाप्रकारे काही अप्रिय घटना घडली तर आम्ही कडक कारवाई करू शकतो", असं माथूर म्हणाले.

पोलिसांनीही कुठल्याच दबावाखाली काम करू नये. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. क्राईम ब्रांच आणि लोकल पोलिस उपायुक्त कल्याण केसमधे आरोपींचा शोध घेत आहेत आणि संध्याकाळपर्यंत तेही अटकेत असतील. अनेक पोलिस अधिकारी, पोलिस यंत्रणा सोशल मीडियावर अक्टिव्ह आहेत. तेव्हा त्याचाही आधार घेऊ शकतो, असं माथूर यांनी सांगितलं.