एक्स्प्लोर

पनवेलमधील कामोठ्यात मनसैनिकांची फेरीवाल्यांना मारहाण

मनसे कार्यकर्त्यांनी आज (सोमवार) पनवेलमधील कामोठेमध्ये फेरीवाल्यांना मारहाण करत त्यांना हुसकावून लावलं.

पनवेल : मुंबईच्या विक्रोळीमध्ये काल (रविवार) मनसे पदाधिकाऱ्यांना करण्यात आलेली मारहाण आणि त्यानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपमांनी केलेलं चिथावणीखोर ट्विट यामुळं मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण मनसे कार्यकर्त्यांनी आज (सोमवार) पनवेलमधील कामोठेमध्ये फेरीवाल्यांना मारहाण करत त्यांना हुसकावून लावलं. यावेळी आक्रमक मनसैनिकांनी अनधिकृत फेरीवाल्यांचे स्टॉल, भाजीचे गाडेही उधळून लावले. तसंच मोठ्या प्रमाणात स्टॉलची तोडफोडही केली. या सर्व प्रकारामुळे परिसरात तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. फेरीवाल्याच्या मारहाणीनंतर मनसेची ‘कृष्णकुंज’वर तातडीची बैठक मुंबईतील विक्रोळीत मनसेच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीनंतर आणि संजय निरुपम यांच्या चिथावणीखोर ट्विटमुळे मनसेच्या कार्यकर्त्यांत संतापाची भावना निर्माण झाली आहे. त्याच संतापाची झळ आज (सोमवार) पनवेलच्या कामोठे येथील फेरीवाल्यांना सोसावी लागली. दरम्यान, आज राज ठाकरेंच्या निवासस्थानी तातडीची बैठक पार पडली. शुक्रवारपासून मुंबईत पोलीस अधिकारी आणि महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसर्सना राज ठाकरेंच्या नावानिशी पत्र पाठवण्यात येणार आहे. विक्रोळीत मनसे उपविभागप्रमुखाला फेरीवाल्यांकडून मारहाण? मनसेच्या कार्यकर्त्यांनी मानसरोवर स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांना मारहाण करत त्यांच्या सामानाची नासधूस केली. मनसेचे पदाधिकारी महेश जाधव, सुधीर नवले, केसरीनाथ पाटील, अविनाश पडवळ यांच्यासह अनेक मनसे कार्यकर्त्यांनी फूटपाथवर बसलेल्या फेरीवाल्यांना मारहाण करत हुसकावून लावलं. मनसेच्या कार्यकर्त्यांनी अचानक घेतलेल्या पवित्र्यामुळे फेरीवाले आणि पादचाऱ्यांची तारांबळ उडाली. आंदोलनानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची शोधमोहीम सुरु आहे. मनसेच्या आंदोनलानंतर परिसरातील तणाव निवळला असला तरी फेरीवाल्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. फेरीवाले, मराठी पाट्या आणि बँकांमध्ये मराठी व्यवहारासाठी ही पत्रं वाटण्यात येतील. जर संबंधित अधिकाऱ्यांनी दिरंगाई दाखवली तर मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याचा निर्णय कृष्णकुंजवर झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान, काल रात्री विक्रोळीच्या टागोरनगरमध्ये मनसे कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणप्रकरणी काँग्रेसच्या अब्दुल अन्सारी आणि रिझवान नावाच्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. संबंधित बातम्या : मनसेच्या गुंडांनी पुन्हा मार खाल्ला : संजय निरुपम अमित ठाकरे मध्यरात्री 2 वाजता विश्वजित ढोलमांच्या भेटीला

महत्त्वाच्या बातम्या

Pratap Sarnaik Warning : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget