एक्स्प्लोर

वसईत अनधिकृत बांधकामं, तहसीलदारांसमोर मनसेचा ठिय्या

वसईतल्या राजीवली वाघरालपाडा परिसरात डोंगर भूईसपाट करुन परप्रांतियांनी चाळी उभ्या केल्या आहेत.

ठाणे : वसईतल्या अनधिकृत चाळींच्या मुद्द्यावरुन आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. वसईत तहसिलदारांच्या कार्यालयात मनसे कार्यक्रत्यांनी ठिय्या मांडून अनधिकृत चाळींवर कारवाईची मागणी केली. वसईतल्या राजीवली वाघरालपाडा परिसरात डोंगर भूईसपाट करुन परप्रांतियांनी चाळी उभ्या केल्या आहेत. महत्वाचं म्हणजे इथं वन विभागाची 6 हजार एकर आणि आदिवासींसाठी आरक्षित जागा आहे. मात्र महसूल आणि पोलीस खात्याला खिशात ठेवून परप्रांतियांनी इथं अतिक्रमण केलं आहे. त्यांना स्थानिक बिल्डरांचंही पाठबळ मिळतंय. एबीपी माझानं दाखवलेल्या या बातमीबाबत कालच्या जाहीर सभेत राज ठाकरेंनी सरकारचं लक्ष वेधलं आणि कारवाईची मागणीही केली. चाळमाफियांनी काय हैदास घातला आहे? वसई-विरार या परिसरातील सहा हजार हेक्टर शासकीय जमीन, डोंगर भुईसपाट करुन, महापालिका, महसूल विभाग, वन विभाग आणि पोलिसांच्या डोळ्यादेखतं हजारो चाळी या माफियांनी वसवल्या आहेत. कारवाई करण्यास गेलेल्या अधिकाऱ्यांच्या गाड्या या चाळमाफियांनी आपल्या हस्तकांकरवी जाळल्या होत्या. वसईत अनधिकृत बांधकामं, तहसीलदारांसमोर मनसेचा ठिय्या नेमकं प्रकरण काय आहे? वसई पूर्वेकडील राजीवली वाघरालपाडा परिसरात सहा हजार हेक्टर जागा वनविभाग, शासकीय, आरक्षित, तसेच आदिवासी जागा होत्या. आदिवासींना धमकावून शासकीय बांबूना हाताशी धरुन, येथे चाळमाफियांनी अनधिकृत चाळींचं साम्राज्य उभं केलं आहे. या परिसरात दुसरी ‘धारावी’च वसवलेली आहे. धक्कादायक म्हणजे, चाळमाफियांनी या भागात मोठ-मोठे डोंगर पोखरले आहेत. नैसर्गिक नाले मातीचा भराव टाकून बंद करण्यात आले आहेत. डोंगर पोखरुन राजरोसपणे चाळींची बांधकामं सुरुच आहेत. जर कुण्या स्थानिक नागरिकांनी विरोध केला तर त्याला जीवे मारण्याची धमकी दिली जाते. महापालिका, महसूल आणि पोलीस प्रशासन हे सर्वजण आपल्या खिशातच असल्याचे सर्वसामान्यांना सांगून, तक्रारी जागच्या जागी दाबल्या जात आहेत.चाळमाफियांची दादागिरी आणि भ्रष्ट प्रशासनाची हतबलता, यामुळे सर्वसामान्य भूमीपुत्र मात्र हतबल होत असल्याचेच चित्र वसई-विरारमध्ये पाहायला मिळत आहे. राज ठाकरेंकडून दखल राज ठाकरेंनी आपल्या भाषणात जे रेट कार्ड दाखवला होतं, तेच एबीपी माझाने बातमीत दाखवले होते. तीन ते चार लाखात रुम, पाचशे ते हजार रुपयात रुम भाड्याने, 24 तास पाणी, 24 तास लाईट, तर रेल्वे स्टेशनपासून ने-आणची सुविधा, अशा अनेक सुविधांचा उल्लेख या चाळमाफियांच्या पत्रकात आहे. एबीपी माझाने यासंदर्भातील सविस्तर वृत्त 18 फेब्रवारीला प्रसारित केले होते. त्याची दखल घेत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शासकीय सुट्टीच्या दिवशी 19 फेब्रुवारीला केवळ दिखाऊ कारवाई केली होती. मात्र आता राज ठाकरेंनीच मुद्दा हाती घेतल्याने तरी अधिकारी याकडे गांभिर्याने पाहतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. संबंधित बातमी : वसई-विरारमध्ये चाळमाफियांचा हैदोस, राज ठाकरेंकडूनही दखल

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
BMC : वांद्र्यातील फुटबॉल मैदानाचे आरक्षण बदलण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध, नगरसेवकांनी घेतली आयुक्तांची भेट
वांद्र्यातील फुटबॉल मैदानाचे आरक्षण बदलण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध, नगरसेवकांनी घेतली आयुक्तांची भेट
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget