एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महाराष्ट्र धर्म सम्राट.. शिवसेना भवनासमोर मनसेची पोस्टरबाजी
मुंबईत होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मनसेने शिवसेना भवनासमोर पोस्टर्स लावले आहेत.
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 23 जानेवारीला मुंबईत मनसेचं अधिवेशन होणार आहे. त्यासाठी मनसेनं आतापासूनच पोस्टरबाजी सुरू केली आहे. मुंबईतल्या शिवसेनाभवनाबाहेर लावलेल्या पोस्टरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उल्लेख महाराष्ट्र धर्म सम्राट असा करण्यात आला आहे. या पोस्टरचा रंग भगवा असल्याने काही दिवसांपूर्वी मनसेचं भगवेकरण होणार असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोणतेही पोस्टर्स चार रंगात असायचे आता मात्र भगव्या रंगात हे पोस्टर्स दिसत असल्याने सर्वांच्याच भुवया उंचवाल्या आहेत. याविषयी मनसे नेते संदिप देशपांडे यांना विचारले असता, मनसेचा झेंडा बदलण्याचा कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगत यावर अंतिम निर्णय राज ठाकरे घेणार असल्याचेही ते म्हणाले. सध्या महाराष्ट्र धर्म वाचवण्याची गरज आहे, त्यामुळे हे पोस्टर्स भगव्या रंगात लावल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी मनसेचा झेंडा बदलणार असल्याच्या चर्चा रंगत आहे. त्यामुळे 23 जानेवारीला होणाऱ्या अधिवेशनात मनसे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपसोबत मनसे जाणार का? काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. त्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून युती होण्याचेही संकेत देण्यात आले होते. तेव्हापासून मनसे आणि भाजपची जवळीक वाढल्याचे बोलले जात आहे. यावर भाजपसोबत जायचे की नाही हा निर्णय राज ठाकरेच घेतील, असं संदिप देशपांडे म्हणाले. महाविकासआघाडीचं सरकार म्हणजे बोलाचाच भात बोलाचाच कढी महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार म्हणजे बोलाचाच भात, बोलाचीच कढी, असल्याची टीका देशपांडे यांनी केली. ते म्हणाले, आत्तापर्यंत या सरकारकडून केवळ घोषणा झाल्या आहेत, मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही. मनसे झेंडा बदलणार? मनसे लवकरच आपला झेंडा बदलण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 23 जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. याच दिवशी राज ठाकरेंनी मनसेच्या महाअधिवेशानचे आयोजन केलं आहे. त्यावेळी मनसेची नवीन भूमिका राज स्पष्ट करणार असल्याचे समजते. इतकच नाही तर मनसेचा झेंडा बदलण्याची घोषणाही या महाअधिवेशनात होण्याची शक्यता आहे. मनसेचा सध्याच्या झेंड्यामध्ये निळा, पांढरा, भगवा आणि हिरवा रंग आहे. मात्र, आता हा झेंडा बदलून तो पूर्णपणे भगवा किंवा केशरी केला जाणार आहे. मात्र, या वृत्ताला मनसेकडून अधिकृत दुजोरा मिळाला नाही. संबंधित बातमी - MNS Flag | मनसेच्या नव्या झेंड्यावर शिवमुद्रेचा वापर करू नये, आर.आर.पाटील फाऊंडेशनचं मनसेला विनंतीपत्र | ABP Majhaसत्तेसाठी सतराशे साठ महाराष्ट्र धर्मा साठी एकच सम्राट pic.twitter.com/nH28n0JBwA
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 17, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement