एक्स्प्लोर

अयोध्येला निघालो जोशात, राजीनामे मात्र खिशात, मनसेची पोस्टरबाजी

उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सेना भवनासमोर मनसेने केलेली खोचक पोस्टरबाजी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

मुंबई : शिवसेनेने हाती घेतलेल्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनीही शिवसेनेला डिवचलं आहे. 'अयोध्येला निघालो जोशात, राजीनामे मात्र अजूनही खिशात' असं लिहिलेले पोस्टर्स मनसेने शिवाजी पार्क परिसरातील सेना भवनाच्या समोरच झळकवली आहेत. शिवसेना आणि मनसे यांच्यामध्ये रंगणारं पोस्टरयुद्ध नवीन नाही. यापूर्वीही शिवसेनेविरोधात पोस्टरबाजी करुन मनसेने अनेकवेळा बाण सोडले आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसेची खोचक पोस्टरबाजी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण ठाकरे कुटुंब अयोध्या वारीच्या निमित्ताने राजकीय सीमोल्लंघन करणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आदित्य ठाकरेही अयोध्येला जात आहेत. ठाकरे कुटुंब सकाळी 11 वाजता विशेष विमानाने मुंबई विमानतळावरुन रवाना होणार असून दुपारी 2 वाजता फैजाबाद विमानतळावर उतरतील. निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसा राम मंदिराचा मुद्दा उचलला जात आहे. शिवसेनेनेही राम मंदिराचा मुद्दा उचलून धरल्याचं दिसत आहे. शिवसेनेने अयोध्येत रॅलीचं आयोजन केलं आहे. अयोध्येत उद्या (रविवारी) उद्धव ठाकरे सभेला संबोधित करतील. हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावरुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. तर राम मंदिरावरुन भाजप-शिवसेनेचा पोरखेळ सुरु असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 : मी प्रस्थापित गिळलाय, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल, रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया, किती मतं?
मी प्रस्थापित गिळलाय, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल, रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया, किती मतं?
Mumbai Water supply news: मुंबई आणि ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील सात दिवस पाणी उकळून प्या, समोर आलं महत्त्वाचं कारण
मुंबई आणि ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील सात दिवस पाणी उकळून प्या, समोर आलं महत्त्वाचं कारण
NCP Ajit Pawar Camp: पार्थ पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवली; उमेश पाटील, झिशान सिद्दीकींवर मोठी जबाबदारी
पार्थ पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवली, उमेश पाटील, झिशान सिद्दीकींवर मोठी जबाबदारी
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश

व्हिडीओ

Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज ठाकरे कर्जतच्या डोंगरात, स्थानिकांशी संवाद; साय डोंगरातील वृक्षतोड जवळून पाहिली, जाहीर सभेतून एल्गार
Raj Thackeray Karjat: राज ठाकरे कर्जतच्या डोंगरात, स्थानिकांशी संवाद; साय डोंगरातील वृक्षतोड जवळून पाहिली, जाहीर सभेतून एल्गार
Pune MLC Election : 6770 मतांचा फरक; विजयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी, पुणे शिक्षक निवडणुकीत यश मिळाल्यानंतर कौस्तुभ गावडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6770 मतांचा फरक; विजयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी, पुणे शिक्षक निवडणुकीत यश मिळाल्यानंतर कौस्तुभ गावडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिक्षक, पदवीधरमध्ये सत्ताधारी काँग्रेसला कर्नाटकात एकही जागा नाही, दारुण पराभव; बिहारमध्येही मोठा उलटफेर
शिक्षक, पदवीधरमध्ये सत्ताधारी काँग्रेसला कर्नाटकात एकही जागा नाही, दारुण पराभव; बिहारमध्येही मोठा उलटफेर
वीजेचा धक्का लागून शिवसेना विभागप्रमुखाचा मृत्यू; नातेवाईकांसह शिवसेना कार्यकर्त्यांची रुग्णालयात गर्दी
वीजेचा धक्का लागून शिवसेना विभागप्रमुखाचा मृत्यू; नातेवाईकांसह शिवसेना कार्यकर्त्यांची रुग्णालयात गर्दी
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: विधान परिषदेच्या 5 पैकी 3 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
विधान परिषदेच्या 5 पैकी 3 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
Gokul Election: महायुतीचे नेते विशेष विमानाने गोकुळ संचालकांना भेटून गोव्यातून कोल्हापुरात; संचालकांची सुद्धा स्पेशल विमानाने एन्ट्री होणार? नेमक्या कोणत्या सूचना केल्या??
महायुतीचे नेते विशेष विमानाने गोकुळ संचालकांना भेटून गोव्यातून कोल्हापुरात; संचालकांची सुद्धा स्पेशल विमानाने एन्ट्री होणार? नेमक्या कोणत्या सूचना केल्या??
Raviraj Sable Patil : अपक्ष उमेदवार तरी मिळाली मोठी मतं फुटली अन् रीलस्टार रविराज साबळे मराठवाड्यात ठरले जायंट किलर! मराठवाडा पदवीधरच्या निवडणुकीत ट्विस्ट
अपक्ष उमेदवार तरी मिळाली मोठी मतं फुटली अन् रीलस्टार रविराज साबळे मराठवाड्यात ठरले जायंट किलर! मराठवाडा पदवीधरच्या निवडणुकीत ट्विस्ट
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 : मी प्रस्थापित गिळलाय, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल, रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया, किती मतं?
मी प्रस्थापित गिळलाय, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल, रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया, किती मतं?
Embed widget