एक्स्प्लोर

तेव्हा तिजोरी उघडलेली, आता चोरी कशाला? : संदीप देशपांडे

शिवसेनेने मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची टीकाही संदीप देशपांडेंनी केली.

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांच्या वेळी आम्ही तिजोरी उघडी करुन दिली होती, आता चोरी करायची गरज का पडली ? असा सवाल मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या वेळी मनसेने दिलेला प्रस्ताव शिवसेनेने स्वीकारला नाही. त्यावेळी तिजोरी उघडी करुन दिली होती, मग आता चोरी करायची गरज का पडली? असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला. शिवसेनेने मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची टीकाही संदीप देशपांडेंनी केली. मनसेच्या सहा नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला. मुंबईतील ‘मातोश्री’ या निवासस्थानावर त्यांनी हे शिवबंधन बांधलं. अर्चना भालेराव (वॉर्ड 126), परमेश्वर कदम (वॉर्ड 133), अश्विनी मतेकर (वॉर्ड 156), दिलीप लांडे (वॉर्ड 163), हर्षल मोरे  (वॉर्ड 189), दत्ताराम नरवणकर यांनी सेनाप्रवेश केला. मुंबई महापालिकेत मनसेची साथ न सोडणारा एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांनी आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी प्रामाणिक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई महापालिकेतील मनसेच्या सात पैकी सहा नगरसेवकांना पक्षात सामील करुन उद्धव ठाकरेंनी एका दगडात दोन पक्षी मारले. या मास्टरस्ट्रोकमुळे मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्याची स्वप्न पाहणाऱ्या भाजपच्या मनसुब्यांना शिवसेनेने सुरुंग लावला. ‘लवकरच मुंबईत आमचा महापौर बसवू.’ असं वक्तव्य भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केले होतं. भाजपच्या संभाव्य खेळी लक्षात घेऊन शिवसेनेनं तात्काळ एक भन्नाट चाल खेळत मनसेच्या तब्बल 6 नगरसेवकांना फोडलं. या सर्व घडामोडीत शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

संबंधित बातम्या :

घोडेबाजारी केल्याचा आरोप गाढवांनी करु नये : उद्धव ठाकरे

पूर्वाश्रमीचे शिवसैनिक पुन्हा शिवसेनेत : अनिल परब

7 नगरसेवक, 13 आमदार ते मनसेकडे उरलेला एकटा नगरसेवक

पहिल्या मास्टरस्ट्रोकनंतर शिवसेनेची तात्काळ दुसरी खेळी!

शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक, मनसेचे सहा नगरसेवक सेनेसोबत

मनसेची साथ न सोडणारा एकमेव नगरसेवक कोण?

मॉकड्रीलचं कारण देत मुंबई महापालिकेच सर्व दरवाजे बंद!

करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप

दगाफटका योग्य नाही, नगरसेवकांवर राज ठाकरे भडकले

‘लवकरच मुंबईत आमचा महापौर’, सोमय्यांचं शिवसेनेला आव्हान

मोठे दावे करणार्‍यांचे पोट फाडून भाजपचा विजय : आशिष शेलार

भांडुप पोटनिवडणुकीत भाजपचा विजय, सत्ता समीकरणं कशी बदलणार?

मुंबई वॉर्ड क्रमांक 116 पोटनिवडणूक : भाजपच्या जागृती पाटील विजयी

करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप

शिवसेनेला पश्चाताप, जागृती पाटील सेनेत येणार होत्या!

फोडाफोडी आणि थैलीशाहीचे राजकारण नेहमीच यशस्वी होत नाही: शिवसेना

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe VIDEO : ज्या महिलांकडून सत्कार, त्यांच्याकडूनच विनयभंगाची तक्रार, स्वतःचे कपडे फाडून घेण्याचा डाव; तुकाराम मुंढेंनी सागितला धक्कादायक किस्सा
ज्या महिलांकडून सत्कार, त्यांच्याकडूनच विनयभंगाची तक्रार, स्वतःचे कपडे फाडून घेण्याचा डाव; तुकाराम मुंढेंनी सागितला धक्कादायक किस्सा
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचा राजीनामा, सचिवांकडून पुढील प्रक्रियेला सुरुवात, तक्रारींची चौकशी सुरु झाल्याची माहिती 
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचा राजीनामा, सचिवांकडून पुढील प्रक्रियेला सुरुवात, तक्रारींची चौकशी सुरु झाल्याची माहिती 
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget