एक्स्प्लोर
महिलेच्या विनयभंगाप्रकरणी मनसे नगरसेवक सुधीर जाधव अटकेत

मुंबई : मुंबई महापालिकेतील मनसे नगरसेवक सुधीर जाधव यांना अटक झाली आहे. महिलेला अश्लाघ्य व्हॉट्सअॅप मेसेज पाठवून विनयभंग केल्याच्या आरोपाखाली जाधव यांना दादर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दादरमध्ये पत्नीचा प्रचार करण्यासाठी सुधीर जाधव पीडित महिलेच्या घरी गेले होते. त्यानंतर दारुच्या नशेत व्हॉट्सअॅपवरुन जाधव यांनी रात्रभर आक्षेपार्ह मेसेज आणि व्हिडीओ कॉल केल्याचा आरोप महिलेने केला आहे. आपला पूर्ण फोटो पाठवण्याचा आग्रह जाधव यांनी केल्याचा दावा तक्रारदार महिलेने केला आहे.
महिलेला आक्षेपार्ह व्हॉट्सअॅप, मनसे नगरसेवकावर गुन्हा
त्यानंतर पोलिस तक्रार करु नये म्हणून आपल्याला धमकावण्यात आल्याचंही महिलेनं म्हटलं आहे. दादर पोलिस स्टेशनमध्ये कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनतर जाधव यांना अटक करण्यात आली आहे. सुधीर जाधव यांच्या पत्नी स्नेहल जाधव यांना वॉर्ड क्रमांक 192 मधून मनसेनं उमेदवारी दिली आहे.Before You Go
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से






















