एक्स्प्लोर

नोटबंदीचा निर्णय फसला तर देश खड्ड्यात जाईल : राज

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नोटाबंदीचा निर्णय फसला तर देश खड्ड्यात जाईल, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. रविंद्र नाट्य मंदिरात मुंबई आणि ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय पूर्ण विचारांती घेतलेला नाही. नोटाबंदीमुळे देशाचा फायदा होत असेल तर मोदींचं स्वागत आहे. पण विचारपूर्वक निर्णय घेतला नसेल तर देश खड्ड्यात जाईल, असं राज ठाकरे म्हणाले. सरकार रोज नवीन उपाय शोधत आहे, कधी मर्यादा वाढवतात, कधी वृद्धांसाठी रांगा, याबाबत आधी विचार केलाच नव्हता, असं राज यांनी सांगितलं. काळा पैसावाल्यांवर धाडी का नाहीत? राज ठाकरे म्हणाले की, "काळा पैशाला आळा घालण्यासाठी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण काळा पैसा असणाऱ्यांवर धाडी का टाकल्या नाहीत? सामान्य लोक रांगेत का आहेत? बँकांच्या रांगेत आज जवळपास 40 लोकं गेली जी सामान्य माणसं होती, यात एकही काळा पैसेवाला आहे का?" काळा पैसा बाहेर काढायचा म्हणून नोटबंदीचा निर्णय घेतला आणि भाजपचेच खासदार जनार्दन रेड्डी मुलीच्या लग्नावर 500 कोटी रुपये खर्च करतात. काँग्रेसच्या काळात भाजपच्या याच नेत्याला तुरुंगात टाकलं होतं. मात्र नोटाबंदीच्या निर्णयानंतरही हा खासदार 500 कोटी रुपये खर्च करुन मुलीचं लग्न करतो, असा टोला रा ठाकरेंनी लगावला. भाजपने 2014 च्या निवडणुकांचा हिशेब दिलेला नाही : राज ठाकरे नरेंद्र मोदी, तुम्हाला काळ्या पैशाबद्दल इतका तिरस्कार होता, तर एक सांगा, तुम्ही निवडून कसे आलात? भाजपने 2014 च्या लोकसभा निवडणुकांचा हिशेब दिलेला नाही. अरुण जेटलींनी लोकसभा निवडणूक लढवताना 82 लाख रुपये कॅश जाहीर केली होती मग ती रक्कम पण काळा पैसा म्हणायचा का?, असा जळजळीत प्रश्न राज ठाकरेंनी विचारला. 'सकाळी गोव्यात हुंदका, संध्याकाळी बारामतीत पवारांचं कौतुक' या मेळाव्यात मनसे अध्यक्षांनी मोदी-पवार भेटीचाही समाचार घेतला. राज ठाकरे म्हणाले की, "मोदी सकाळी गोव्यात हुंदका देतात आणि संध्याकाळी बारामतीत जाऊन पवारांवर स्तुतीसुमनं उधळतात. मी शरद पवारांचं बोट धरुन राजकारणात आलो असं सांगतात. मात्र पवारांचं बोट धरुन तर अजित पवार पण राजकारणात आले." राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे - भाजपने 2014 च्या निवडणुकांचा हिशेब दिलेला नाही : राज ठाकरे - जिल्हा बँका बंद करण्याच्या निर्णयावर मोदी आणि आरबीआयचं एकमेकांकडे बोट : राज ठाकरे - नोटाबंदीवर अद्याप संघाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही : राज ठाकरे - देशात दंगली घडण्याची भीती व्यक्त केलेली, काल सुप्रीम कोर्टानेही तेच मत नोंदवलं : राज ठाकरे - सकाळी गोव्यात हुंदका, संध्याकाळी बारामतीत जाऊन पवारांवर स्तुतिसुमनं : राज ठाकरे - रिलायन्स जिओचं मोफत कनेक्शन आणि जुन्या नोटा जमा करण्याची तारीख 30 डिसेंबर, इतका योगायोग कसा? : राज ठाकरे - दोन हजारच्या नोटा छापायला सहा महिन्यांपूर्वी सुरुवात, मग आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलांची सही कशी? : राज ठाकरे - पाचशे-हजारच्या नोटा बंद करुन दोन हजारच्या नोटा आणल्या, अशाने काळा पैसा बाहेर येईल? : राज ठाकरे - दहा महिन्यांपासून नोटाबंदीची तयारी सुरु होती, तर नोटा छपाईचं टेंडर दहा दिवसांपूर्वी का निघालं? : राज ठाकरे - इतक्या विश्वासाने देश हातात दिला असताना विचारपूर्वक निर्णय का घेतला नाही? : राज ठाकरे - एटीएममध्ये नवीन नोटेचा आकार बसत नाही, याचा विचार आधी केला नव्हता का? : राज ठाकरे - काळा पैसा असणाऱ्यांवर धाडी का टाकल्या नाहीत?, सामान्य लोक रांगेत का? : राज ठाकरे - रोज नवीन उपाय शोधतात, कधी मर्यादा वाढवतात, कधी वृद्धांसाठी रांगा, याबाबत आधी विचार केलाच नव्हता : राज ठाकरे - नोटाबंदीच्या निर्णयानंतर एकमेकांकडे न पाहणारे आता गळ्यात गळे घालून फिरत आहेत : राज ठाकरे - मनसेकडे माणसांची कमतरता नाही, मात्र फंडिंगची होती, इतर पक्ष दोन पायांवर धावणार आणि आम्ही लंगडीनं : राज ठाकरे - नोटाबंदीचा निर्णय पूर्ण विचारांती नाही : राज ठाकरे - नरेंद्र मोदींचा निर्णय फसला, तर देश खड्ड्यात जाईल : राज ठाकरे - नोटाबंदीच्या निर्णयावर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया नाहीत : राज ठाकरे - विचारपूर्वक निर्णय घेतला नसेल तर देश खड्ड्यात जाईल : राज ठाकरे - नोटबंदीचा निर्णय विचारपूर्वक घेतला नसेल तर देश खड्ड्यात जाईल : राज ठाकरे - नोटबंदीच्या निर्णयाचा फायदा होणार असेल, तर हरकत काय : राज ठाकरे - नोटाबंदी आपल्या पक्षासाठी एकदम चांगली : राज ठाकरे

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! मेघवाडी पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 13 लाखांचा मुद्देमालाही  दरोडा
धक्कादायक! मेघवाडी पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 13 लाखांचा मुद्देमालाही  दरोडा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget