एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

आशिष शेलार आणि राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर गुप्त बैठक

शेलार आणि राज ठाकरे यांची घरगुती विषयांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज यांचे पुत्र अमित यांच्या लग्नाला भाजपकडून कोणाला बोलवायचं, यावर चर्चा झाल्याची माहिती आहे.

मुंबई : भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. ही बैठक घरगुती स्वरुपाची असली तरी त्यात राजकीय चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. आशिष शेलार हे राज ठाकरेंच्या भेटीला कृष्णकुंज या निवासस्थानी आले होते. यावेळी त्यांची घरगुती विषयांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज यांचे पुत्र अमित यांच्या लग्नाला भाजपकडून कोणाला बोलवायचं, यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. रविवार, 27 जानेवारीला दुपारी 12 वाजून 51 मिनिटांनी अमित ठाकरेंच्या लग्नाचा मुहूर्त आहे. मुंबईतील लोअर परळ भागातल्या 'सेंट रेजिस'मध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. प्रसिद्ध बॅरिअॅट्रिक सर्जन डॉ. संजय बोरुडे यांची कन्या मितालीसोबत अमित विवाहबंधनात अडकणार आहेत. अमित आणि मिताली यांची जुनी ओळख होती. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आशिष शेलार आणि राज ठाकरे तब्बल दोन तास गप्पा मारत होते. व्यक्तिगत गप्पांसोबत आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही गुफ्तगू झाल्याचं म्हटलं जात आहे. याआधीही राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यामध्ये अनेकदा बैठका झाल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील; अजित पवार यांचं मोठं विधान
तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील; अजित पवार यांचं मोठं विधान
Horoscope Today 08 October 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Ravindra Chavan: डोंबिवली विधानसभा मतदारसंघात अर्तक्य हालचाली, श्रीकांत शिंदेंचा कट्टर समर्थक ठाकरेंकडे, रवींद्र चव्हाणांना विधानसभेला घेरण्याची तयारी?
दीपेश म्हात्रेंच्या ठाकरे गटातील प्रवेशानंतर डोंबिवलीत वेगळीच चर्चा, रवींद्र चव्हाणांना घेरण्यासाठी सर्वपक्षीय मोहीम?
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Metro 3:आरे ते बीकेसी भुयारी मेट्रो-3 मुंबईकरांच्या सेवेत,तासाभराचा प्रवास अवघ्या 22मिनिटांवरTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 08 ऑक्टोबर 2024 : ABP Majha : 6 AMHarshvardhan Patil : इंदापुरातून हर्षवर्धन पाटलांना तिकीट? लोकसभेतल्या मदतीची परतफेड? Special ReportRamraje Nimbalkar May Join NCP Sharad Pawar :पवारांनी कसली कंबर,रामराजेंचा तिसरा नंबर?Special report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील; अजित पवार यांचं मोठं विधान
तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील; अजित पवार यांचं मोठं विधान
Horoscope Today 08 October 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Ravindra Chavan: डोंबिवली विधानसभा मतदारसंघात अर्तक्य हालचाली, श्रीकांत शिंदेंचा कट्टर समर्थक ठाकरेंकडे, रवींद्र चव्हाणांना विधानसभेला घेरण्याची तयारी?
दीपेश म्हात्रेंच्या ठाकरे गटातील प्रवेशानंतर डोंबिवलीत वेगळीच चर्चा, रवींद्र चव्हाणांना घेरण्यासाठी सर्वपक्षीय मोहीम?
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
Numerology : प्रचंड आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर
प्रचंड आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनीची वक्री; 3 राशींचे अच्छे दिन होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनीची वक्री; 3 राशींचे अच्छे दिन होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, सुषमा अंधारेंनी उघड केलं नाव; पुण्यातील जागाही सांगितल्या
ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, सुषमा अंधारेंनी उघड केलं नाव; पुण्यातील जागाही सांगितल्या
Embed widget