Mumbai Traffic News:  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) मान्सून दरम्यान रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी करून नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) निर्माणाधीन मेट्रो प्रकल्पातील उन्नत मार्गाचं काम जिथे जिथे झालं आहे तेथील बॅरिकेड्स काढण्याचा निर्णय घेतला आहे. सहा मेट्रो प्रकल्पातील एकूण 33,922 बॅरिकेडस काढल्याने दुतर्फा 84.806 (42 किमी एकेरी रस्ता) किमी. लांबीचा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला आहे. मुंबई महानगर प्रदेशात सुमारे 337 किमी लांब मेट्रोचं जाळं प्राधिकरणामार्फत उभारण्यात येत आहे. त्यापैकी मेट्रो मार्ग 2ब, 4, 4अ, 5,6, 7अ आणि 9 या मेट्रो मार्गांसाठी लावण्यात आलेल्या बॅरिकेड्स पैकी सुमारे 60 टक्के बॅरिकेड्स हटवण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा प्रत्येकी एक-एक मार्गिका वाहतुकीसाठी उपलब्ध झाली असल्याची माहिती एमएमआरडीएने दिली आहे. 

 

कोणत्याही निर्माणाधीन प्रकल्पात नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एका विशिष्ट रुंदीचा भाग बॅरीकेड्स (पत्र्याचे अडथळे) लावून प्रतिबंधित केला जातो. पण तो प्रकल्प पूर्ण होईपर्यंत रस्ता अडवला जात असल्याने अनेकदा नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं जागतं. त्यावर उपाय म्हणून एमएमआरडीएने हा निर्णय घेतला आहे. तसचे काही ठिकाणी बॅरिकेड्स ठेवणं अपरिहार्य होतं तिथे ते रस्त्याची कमीत कमी जागा व्यापतील अशा पद्धतीने लावण्याचा निर्णय घेतला गेला. ज्यामुळे अशा ठिकाणी 8 किमीहून लांबीचा अधिक रुंद  रस्ता उपलब्ध झाला आहे. एकूण 3352 बॅरिकेड्स अशा पद्धतीने कमी कमी जागा व्यापतील असे पुनर्रचना करण्यात आली आहे. 

 

महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, भा. प्र.से. यांनी मुंबई महानगर प्रदेशात प्रगतीपथावर असलेल्या सर्व मेट्रो प्रकल्पातील काम पूर्ण झालेल्या ठिकाणच बॅरिकेड्स काढून रस्ते पूर्वस्थितीत खुले करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर अनेक महत्वाच्या रस्त्याचा भाग मोकळा झाल्यानं मान्सून दरम्यान नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग, बीकेसी, . एस. व्हि.रोड, वी.एन. पुरव मार्ग(चेंबूर नाका),न्यू लिंक रोड, गुलमोहर रोड, , एम जी रोड, घोडबंदर रोड, कापूरबावडी, बाळकुम, दहिसर, मिरारोड, भाईंदर, ठाणे, तीन हात नाका, जेव्हिएलआर, इन्फिनिटी मॉल, पवई, कांजूरमार्ग, मानखुर्द या भागातील प्रगतीपथावर असलेल्या मेट्रो मार्गांवरील हे बॅरिकेड्स काढण्यात आले आहेत. ज्यामुळे प्रकल्पाच्या दोन्ही बाजूची १- १ मार्गिका वाहतूकीसाठी मोकळी करून नागरिकांना अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.

 

 

अवघ्या महिन्याभरात प्राधिकरण्याच्या कर्मचाऱ्यानी 30 हजाराहून अधिक बॅरिकेड्स काढले आहेत. दर 15 दिवसांनी मेट्रोच्या कामाचा आणि बॅरिकेड्सचा आढावा घेतला जाणार असून एखाद्या ठिकाणी काम संपलं की लगेचच तो रस्ता वाहतुकीसाठी खुला करुन दिला जाईल.  तसेच रस्त्यांलगतचे सर्व बॅरिकेड्स (barricades) कमीत कमी जागेत लावून जास्तीत जास्त रस्ता रहदारी साठी मोकळा ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली. 

 

कोणत्या मार्गावरील बॅरिकेड्स हटवण्यात आले?


 

>> मेट्रो मार्ग 2 ब


 

- गुलमोहर रोड (जुहू सर्कल ते मिठीबाई महाविद्यालय) 1.767 किमी

 

- एस.व्ही. रोड (विले पार्ले जंक्शन ते मिलन सबवे) 1.057 किमी 

 

- बीकेसी रोड (कलानगर ते MTNL) 1.536 किमी

 

- व्ही. एन. पूर्व मार्ग (डायमंड गार्डन ते BARC फ्लायओव्हर) 1.408 किमी

 

- सायन- पनवेल हायवे (BARC फ्लायओव्हर ते मानखुर्द फ्लायओव्हर) 1.459 किमी

 

>> मेट्रो मार्ग 4 आणि  4अ


 

- 90 फिट रोड - 3.990 किमी

 

- एलबीएस मार्ग (वेगवेगळ्या तीन ठिकाणी) 15 किमी

 

- ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे 4.726 किमी

 

- घोडबंदर रोड (वेगवेगळ्या दोन ठिकाणी) 4 किमी 

 

- डेपो रोड 1.154 किमी

 

>> मेट्रो मार्ग 5


 

- कापूरबावडी ते बाळकुम नाका 1.553 किमी 

 

- बाळकुम नाका ते अंजूरफाटा 7.573 किमी

 

- अंजूरफाटा ते धामणकर नाका 2.033 किमी

 

>> मेट्रो मार्ग 6


 

- JVLR (WEH जंक्शन ते महाकाली लेणी) 4.30  किमी

 

- JVLR (महाकाली लेणी ते पवई तलाव) 4.19 किमी 

 

- JVLR (पवई तलाव- विक्रोळी - EEH वर कांजूर मार्ग डेपो) 6.5 किमी 

 

>> मेट्रो मार्ग 9


 

- ओवारीपाडा जंक्शन ते दहिसर टोल 1.648 किमी 

 

- दहिसर टोल ते डेल्टा 1.710 किमी 

 

>> खड्डे बुजवण्याचे काम हाती 


 

मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना पावसाळ्यात त्रास होणार नाही याची सर्वतोपरी काळजी प्राधिकारणामार्फत घेतली जात आहे. विशेषत: एमएमआरडीएच्या अखत्यारित येणाऱ्या रस्त्यावरील खड्डे भरण्यात येत आहेत, पावसाळ्यात पाणी साचेल अशा जागा आधीच लक्षात घेऊन तिथे मोटर पंप लावण्यात आले आहेत, म्हणजे अतिवृष्टीमुळे साचलेले पाणी पंपाद्वारे उपसा करून त्याचा योग्य निचरा करता येईल. त्यासोबतच नागरीकांनी प्राधिकरणाच्या २४ तास आपत्कालीन नियंत्रण कक्षास संपर्क साधून केलेल्या तक्रारीचे निवारण तात्काळ करण्याच्या सूचना सर्व विभागांना महानगर आयुक्तांनी दिल्या आहेत.