एक्स्प्लोर
Advertisement
एमएमआरडीएकडून मुंबईबाहेर वसवलं जातंय सेकंड आरे
मेट्रो 3 साठी प्रशासनाने आरो कॉलनीतील 2700 झाड तोडली, येत्या पाच वर्षात एमएमआरडीएला मेट्रो 2 आ, मेट्रो 2 ब, मेट्रो 4, मेट्रो 7 या प्रकल्पांसाठी हजारोंच्या संख्येनं झाडं तोडावी लागणार आहेत. ही वृक्षतोड करण्यापूर्वीच भरपाई म्हणून एमएमआरडीएने वृक्षलागवडीचे उपक्रम सुरु केले आहेत.
मुंबई : एकीकडे मेट्रो 3 साठी मुंबईत आरे कॉलनीतली झाडं तोडली जात असताना मुंबईबाहेर एमएमआरडीए प्रशासनानं सेकंड आरे तयार करण्याचं ठरवलं आहे. यासाठी शिळफाटा, ठाणे, गोठेघर या परिसरात तब्बल 51 हजार 151 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
एमएमआरडीए, वनविभाग, महाराष्ट्र वनविकास महामंडळाकडून वनविभागाच्या 46 हेक्टर जमिनीवर ही झाडं लावण्यात आली आहेत. यासाठी प्रत्येक झाडावर 1 हजार 228 रुपये खर्च करण्यात आला आहे. म्हणजेच या सेकंड आरेसाठी तब्बल 6 कोटी 28 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. प्रत्येक झाडाच्या पुढील 3 वर्षांपर्यंतचा देखभालीचा खर्चही यामध्ये समावेश आहे.
सेकंड आरेमध्ये बकुळ, कडुलिंब, कांचन, बेहडा, जांभुळ अशा स्थानिक प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. येत्या पाच वर्षात एमएमआरडीएला मेट्रो 2 आ, मेट्रो 2 ब, मेट्रो 4, मेट्रो 7 या प्रकल्पांसाठी हजारोंच्या संख्येनं झाडं तोडावी लागणार आहेत. ही वृक्षतोड करण्यापूर्वीच भरपाई म्हणून एमएमआरडीएने वृक्षलागवडीचे उपक्रम सुरु केले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement