मुंबई: आज विधान परिषदेच्या 11 जागांसाठी (Maharashtra Legislative Council Election 2024) मतदान होत आहे. या निवडणुकीमध्ये आमदार फुटण्याची भीती जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांना आहे. अशातच काँग्रेसचे आमदार फुटणार असल्याचा दावा केला जात आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे आता कोणत्या उमेदवाराचा पराभाव होणार अशी चर्चा आहे. अशातच आता आमदार फुटाफुटीच्या चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रसचे 8 आमदार फुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सूरू आहे. 4 आमदार राष्ट्रवादीने काँग्रेस(अजित पवार गटाने) तर भाजपने देखील 4 आमदार फोडल्याची चर्चा रंगली आहे. अशातच काँग्रेसचे किती आमदार फुटणार हे स्पष्ट दिसून येईल असं भाजपचे आमदार संजय कुटे(Sanjay Kute)यांनी म्हटलं आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना आमदार फुटणार नसून आम्हाला कोणतीही भिती नसल्याचं काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. 

Continues below advertisement


आमदार फुटीवर काय म्हणालेत संजय कुटे?


काँग्रेसचे जे 37 आमदार आहेत. त्यातील किती टिकतात हे निवडणुकीत दिसून येईल. काँग्रेसच्या मतांनी कुठं जायचंय आणि कोणाला मत द्यायचं यांची त्यांनीच व्यवस्थित काळजी घेतली आहे, असं आमदार संजय कुटे(Sanjay Kute) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. 


आमदार फुटीवर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया


त्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, काँग्रेसची 9 मते फुटणार हा जावई शोध कुठून आणलात. काल (गुरूवारी) काँग्रेसचे 37 पैकी 35 आमदार उपस्थित होते. ज्यांना फुटीची भीती आहे ते हॉटेलमध्ये पळाले. त्यांनी आपले आमदार गोळा करून हॉटेलमध्ये आश्रय घेतला, आम्ही आमचे आमदार हॉटेलमध्ये ठेवले नाहीत असं म्हणत त्यांनी महायुतीतील पक्षांना टोला लगावला आहे,  महाविकास आघाडीचे तिन्ही आमदार निवडून येतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 


विधान परिषद निवडणुकीत पैशांचा मोठा घोडेबाजार?


काँग्रेसकडे अधिकची मतं आहेत. विधान परिषदेसाठी 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 23 मतांचा कोटा पूर्ण झाल्यानंतर जी मते राहतील ती मतं फुटतील, अशी शक्यता वर्तवली जात होती.