एक्स्प्लोर

आमदार रमेश कदमांची मुजोरी कायम, पुन्हा पोलिसाला शिवीगाळ

मुंबई : अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात कोट्यवधींचा घोटाळा करणारे राष्ट्रवादी काँग्रेस माजी आमदार रमेश कदम यांची मुजोरी अजूनही सुरुच आहे. रमेश कदम यांनी पुन्हा एकदा पोलिसाला शिवीगाळ केली आहे. या प्रकरणी नागपाडा पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील दोन आठवड्यात दोन वेळा त्यांच्या गुन्हा दाखल झाला आहे. रमेश कदम सध्या भायखळा तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. जेलमधील एका पोलिस कॉन्टेबलने शुक्रवारी सकाळी रमेश कदम यांना त्यांच्या सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये जाताना पाहिलं. परत येण्यास सांगितलं असता कदमांचा पारा चढला आणि पोलिसाला शिवगाळ केली. यानंतर नागपाडा पोलिस स्टेशनमध्ये रमेश कदम यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणी रमेश कदमांवर एफआयआर नोंदविण्यात आली आहे. आमदार रमेश कदमांची मुजोरी कायम, पोलिसांना शिवीगाळ याआधी 19 मे रोजी ड्यूटीवर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ केल्याचा रमेश कदम यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. रुटीन चेकअपसाठी रमेश कदम यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात गुरुवारी आणलं होतं. मात्र, कदम रुग्णालयात जाण्यास तयार नव्हतं. या वेळी पोलिसांनी व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केला. तसंच पोलिस अधिकाऱ्याने रमेश कदम यांचे म्हणणे लिहून घेण्यास सांगितल्यानंतर कदमांच्या रागाचा पारा चढला. त्यांनी पोलिस अधिकारी मनोज पवार यांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर नागपाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. दरम्यान या घोटाळ्याप्रकरणी आमदार रमेश कदम यांना ऑगस्ट, 2015 मध्ये अटक करण्यात आली होती. पहिल्यांदा त्यांना आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. काही महिन्यांपूर्वीच त्यांना भायखळ्याच्या पुरुष कारागृहात हलवण्यात आलं. काय आहे अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा? अण्णाभाऊ साठे महामंडळात 250 कोटींचा गैरव्यवहार झाला असून त्याचे 3700 पानी पुरावे आपण लाचलुचपतसह सर्व विभागांना दिले असल्याचा दावा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केला. या घोटाळ्याबाबत महामंडळाचे माजी अध्यक्ष आमदार रमेश कदम यांच्यावर ढोबळेंनी थेट आरोप केला आहे. – कोणतीही प्रक्रिया न राबवता 73 जणांची भरती – उस्मानाबादच्या नेटकेंनी मुलाला, बावणेंनी मुलीला सेवेत घेतलं – नियुक्त झालेल्यांना 20 लाखांचं गृहकर्ज उपलब्ध करुन दिलं. त्यातले 15 लाख रुपये लाच म्हणून घेण्यात आले. – अनेक कर्ज प्रकरणावर खोट्या सह्या घेतल्या – लाभार्थींचे चेक परस्पर वाटण्यात आले – महालक्ष्मी दूध संस्था, खंडाळी, बारामीत दूध संघाला 5 कोटी कागदोपत्र वाटण्यात आले – विधानसभा निवडणुकीत रमेश कदमांनी 6 कोटी 56 लाख रुपये वाटल्याचा आरोप 19 मे रोजीचा व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Drought: राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळाची घोषणा, ट्रिगर वन लागू, सर्वाधिक दुष्काळी तालुके कोणत्या जिल्ह्यात, वाचा सविस्तर यादी
राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळाची घोषणा, ट्रिगर वन लागू, सर्वाधिक दुष्काळी तालुके कोणत्या जिल्ह्यात, वाचा सविस्तर यादी
Maharashtra Drought: मोठी बातमी: राज्यात दुष्काळ जाहीर, देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 10 मोठे लाभ मिळणार
मोठी बातमी: राज्यात दुष्काळ जाहीर, देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 10 मोठे लाभ मिळणार
Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2026 LIVE: 'लालबागचा राजा'चं विसर्जन संपन्न, भाविक गहिवरले, अत्याधुनिक तराफ्यावरुन खोल समुद्रात लाडक्या राजाचं विसर्जन
LIVE: 'लालबागचा राजा'चं विसर्जन संपन्न, भाविक गहिवरले, अत्याधुनिक तराफ्यावरुन खोल समुद्रात लाडक्या राजाचं विसर्जन
Mumbai Accident News: 'KG मार्गचा राजा'च्या विसर्जन मिरवणुकीत भरधाव होंडा सिटी घुसली; चार भाविक जखमी, मुंबईत काळजाचा ठोका चुकवणारी घटना
'KG मार्गचा राजा'च्या विसर्जन मिरवणुकीत भरधाव होंडा सिटी घुसली; चार भाविक जखमी, मुंबईत काळजाचा ठोका चुकवणारी घटना

व्हिडीओ

Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
Lalbaugcha Raja Visarjan 2026: नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; मिरवणुकीला सुरुवात, कार्यकर्ते भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Ganeshotsav Visarjan: मिरवणूक विद्यानंद बापटांच्या घराबाहेर चढताच डीजेवर नाचणाऱ्यांना चेव चढला, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् वाक्याचा गजर, नेमकं काय घडलं?
मिरवणूक विद्यानंद बापटांच्या घराबाहेर चढताच डीजेवर नाचणाऱ्यांना चेव चढला, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् वाक्याचा गजर, नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil: अंतरवाली सराटीतून एका रात्रीत उपोषणाचा मंडप हटवला, मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
अंतरवाली सराटीतून एका रात्रीत उपोषणाचा मंडप हटवला, मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Premanand Maharaj Disciple: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या शिष्याचं टोकाचं पाऊल; चौथ्या मजल्यावरून मारली उडी, आश्रम परिसरात खळबळ, कारण अस्पष्ट
वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या शिष्याचं टोकाचं पाऊल; चौथ्या मजल्यावरून मारली उडी, आश्रम परिसरात खळबळ, कारण अस्पष्ट
Maharashtra Drought: मोठी बातमी: राज्यात दुष्काळ जाहीर, देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 10 मोठे लाभ मिळणार
मोठी बातमी: राज्यात दुष्काळ जाहीर, देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 10 मोठे लाभ मिळणार
Manoj Jarange Jalna : मनोज जरांगेंना आणखी एक झटका, कोणाला सुगावा लागू न देता अंतरवाली सराटीतून एका रात्रीत उपोषणाचा मंडप हटवला, नेमकं काय घडलं?
मनोज जरांगेंना आणखी एक झटका, कोणाला सुगावा लागू न देता अंतरवाली सराटीतून एका रात्रीत उपोषणाचा मंडप हटवला, नेमकं काय घडलं?
Shivsena Leader Shivajirao Shinde: मोठी बातमी: शिंदे गटाच्या बीडमधील बड्या नेत्याचा टोकाचा निर्णय, गळ्याला दोर लावून आयुष्य संपवलं
मोठी बातमी: शिंदे गटाच्या बीडमधील बड्या नेत्याचा टोकाचा निर्णय, गळ्याला दोर लावून आयुष्य संपवलं
Ahilyanagar Crime News: अशोक खरात प्रकरणाचा भांडाफोड करणारा 'तो' पत्रकारच अडकला; महिला ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडे 1 लाखाची खंडणी मागितली अन्...; नेमकं काय घडलं?
अशोक खरात प्रकरणाचा भांडाफोड करणारा 'तो' पत्रकारच अडकला; महिला ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडे 1 लाखाची खंडणी मागितली अन्...; नेमकं काय घडलं?
Maharashtra Drought: राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळाची घोषणा, ट्रिगर वन लागू, सर्वाधिक दुष्काळी तालुके कोणत्या जिल्ह्यात, वाचा सविस्तर यादी
राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळाची घोषणा, ट्रिगर वन लागू, सर्वाधिक दुष्काळी तालुके कोणत्या जिल्ह्यात, वाचा सविस्तर यादी
Embed widget