एक्स्प्लोर

पक्षाने कारवाई केल्यास घरी जाऊन शेती करेन: आ. अनिल गोटे

मुंबई: भाजप आमदार अनिल गोटे यांनी आज संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापटांनी बजावलेल्या कारणे दाखवा नोटीशीला उत्तर दिलं. ‘पक्षाने कारवाई केल्यास घरी जाऊन शेती करेन.’ अशा शब्दात अनिल गोटे यांनी या नोटीशीला उत्तर दिलं. ‘वरिष्ठ सभागृहातील सदस्य कामकाजात अडथळा आणतात. महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेच्या आशा आकांक्षांच्या मध्ये येण्याचं काम विधानपरिषद करणार असेल तर परिषदेचं अस्तित्व हवंच कशाला?’  असं म्हणत आमदार गोटेंनीच प्रतिप्रश्न केला आहे. ‘विधानपरिषदेबाबतच्या वक्तव्यावर तुम्ही ठाम आहेत का? असं मुख्यमंत्र्यांनी विचारल्यावर मी ठाम असल्याचं सांगितलं. पण आता या विषयावर बोलणार नाही. पक्षाची शिस्त पाळीन.’ असं उत्तर गोटेंनी दिलं आहे. पक्ष नेतृत्वाला किंवा मुख्यमंत्र्यांना माझं स्पष्टीकरण मान्य नसेल तर पक्ष जी कारवाई करेल त्याचा शिस्तबद्ध सैनिक म्हणून स्वीकार करीन. पण कोणत्याही झुंडशाहीला दबणार नाही. पक्षाने कारवाई केल्यास घरी जाऊन शेती करेन. पण पक्षफोड्या, घरफोड्या नेत्यांच्या आश्रयाला जाणार नाही. असंही आमदार गोटेंनी ठणकावून सांगितलं. काय आहे प्रकरण: विधानपरिषद बरखास्त करा अशी मागणी भाजपचे आमदार अनिल गोटेंनी केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद विधानपरिषदेमध्ये उमटले होते. अनिल गोटेंनी विधानसभेत बोलताना विधानपरिषद बरखास्त करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतर त्यांचं वक्तव्य कामकाजातून काढण्यात आलं होतं. यानंतर अनिल गोटे यांना संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. विधानपरिषद बरखास्त करावी अशी सरकारची किंवा पक्षाची भूमिका नसताना तुम्ही वारंवार अशी वक्तव्य का करत आहात? असा सवालही त्यांना विचारण्यात आला होतं. दरम्यान, याबाबत बोलताना काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली होती. ‘गोटेंचं वक्तव्य हे सभागृहाच्या उंचीला शोभणारं नाही’. असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी गोटेंना सुनावलं होतं. अनिल गोटेंनी विधानपरिषद बरखास्तीची मागणी केल्यानंतर सर्व पक्षातून टीकेची झोड उठली होती. त्यानंतर या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेत निवेदन सादर केलं होतं. यावेळी त्यांनी गोटेंचं वक्तव्य सरकारला आणि वैयक्तिक आपल्यालाही आवडलं नसल्याचं सांगितलं होतं. ‘संविधानाने हे सभागृह तयार झालं आहे, कोणाच्या सांगण्यावरून ते तयार झालेलं नाही.’ असंही मुख्यमंत्री म्हणाले. तसंच विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असल्यानं या सभागृहाबद्दल कुठलीही द्विधा मन:स्थिती नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. संबंधित बातम्या: 'त्या' विधानाबाबत स्पष्टीकरण द्या, आ. अनिल गोटेंना कारणे दाखवा नोटीस

महत्त्वाच्या बातम्या

Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
Mumbai Crime Malad: अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Ravindra Chavan : नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सोले यांच्या घरी पोहोचले पण...
नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण थेट सोले यांच्या घरी पोहोचले पण...
Modi Cabinet Reshuffle : मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी परिसरात मोठी आग; अग्निशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी परिसरात मोठी आग; अग्निशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
Embed widget